Vasubaras Wishes in Marathi 2024 : दिवाळीची पहिली पणती गाय-वासरांसाठी! प्रियजनांना द्या खास मराठीतून शुभेच्छा

Happy Vasubaras Wishes in Marathi : ''दिन दिन दिवाळी गायी – म्हशी ओवाळी गायी – म्हशी कुणाच्या गायी – म्हशी माझ्या मामाच्या'' असा हा दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला साजरा करण्यात येणार आहे. सोमवारी 28 ऑक्टोबरला वसुबारसला पहिली पणती गाय वासरासाठी लावली जाणार आहे. अशा या शुभ दिनाचं आपल्या प्रियजनांना द्या खास मराठीतून शुभेच्छा. WhatsApp, Instagram, Facebook स्टेट्सवरही ठेवा असं हे वसुबारसच्या शुभेच्छा. 

| Oct 27, 2024, 21:33 PM IST
1/7

वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची, वसुबारस म्हणजे पूजा धेनु वासराची.. दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त मंगलमय शुभेच्छा!

2/7

वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा

गोमातेला सांगू आपली गाऱ्हाणी, दुध-दुभत्याची सदा व्हावी वृद्धी, व्हावी कृपा, नांदावी रिद्धीसिद्धी, गोवत्स पूजनाने लाभावी समृद्धी ! दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त, आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!

3/7

वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा

दारी सजले तुळशी वृंदावन, त्यासवे होई कामधेनूचे पूजन, गोमातेच्या उपकारांचे करुणा स्मरण, साजरा करूया वसुबारस हा सण, वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा  

4/7

वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा

दिवाळीचा पहिला सण, ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुख, समृद्धीची व भरभराटीची जावो. वसुबारसनिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

5/7

वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा

गाय आणि वासरांच्या अंगी असणारी वात्सल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी हे सर्व आपणास लाभो…वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!

6/7

वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा

दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा, गाय अन् वासराच्या वात्सल्याचा…! वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

7/7

वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा

वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. वसुबारस आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!