मुलासाठी असं नाव निवडा जे अनोखं तर असेलच पण सोबतच सुंदर देखील असेल. तसेच मोठं नाव ठेवण्यासाठी थोडं दूर राहा. तसेच नाव असं निवडा जे ऐकायला देखील चांगल वाटेल. तसेच नाव निवडताना खालील टिप्सची मदत घ्या कारण यामुळे मुलाचं नाव ठेवण्यास मदत होऊ शकते. मुलांचं नाव ठेवताना अशा लोकांचा सल्ला घ्या जे स्वतः पालक आहेत. कारण त्यांनी देखील आपल्या मुलांसाठी काही नावांचा नक्कीच विचार करायचा असेल. यामुळेच ते उत्तम मार्गदर्शक ठरू शकतात. 


मुलांचे नाव निवडताना फॉलो करा हे नियम 


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    मुलांसाठी असं नाव नका निवडू ज्याला काहीच अर्थ नाही. कायम अर्थपूर्ण नाव निवडणे हे मुलासाठी चांगले असते. कारण मुलाच्या नावाचा संस्कार त्याच्या स्वभावावर होऊ शकतो. 


  • जर तुम्ही सोपं नाव ठेवलात तर ते प्रत्येकाच्या ओढावर राहिल. अनेकदा ज्येष्ठ मंडळींना मुलांची आता मॉडर्न नावे घेणे जमत नाही. तेव्हा त्या नावाचा अपभ्रंश होतो किंवा चुकीचं नाव घेतलं जातं. 


  • मुलासाठी जे नाव निश्चित कराल त्या मागचा अर्थ समजून घ्या. काही पालक मुलांसाठी अगदी चित्रविचित्र नावे ठेवतात. ही मुलं मोठी झाल्यावर त्यांनाच आपल्या नावांवर हसू येतं. 


  • काही पालक मुलांची एकपेक्षा जास्त नावे ठेवतात. हे योग्य नाही. मुलांसाठी फक्त एकच नाव असावं जे आयुष्यभर त्याच्यासोबत राहिल. 



  • तसेच मुलाला नाव निवडताना अशा महान व्यक्तींचं नाव देखील देवू शकता. यामध्ये महान व्यक्तिमत्व, हिंदू राजाचे नाव देखील निवडू शकता. 


  • मुलांची नावे निवडण्यासाठी तुम्ही पुस्तकांची मदत देखील घेऊ शकता. बाजारात अनेक पुस्तके आहेज ज्यामध्ये वेगवेगळ्या नावांवरुन मुलांची आणि मुलींची नावे आणि अर्थ दिले जातात. 



  • मुलांची नावे निवडताना तुम्ही गोत्र आणि नक्षत्र यांचा देखील विचार करु शकता. मुलांच्या जन्माच्या गोत्र आणि नक्षत्रांचा मुलांच्या जीवनावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही याचा विचार देखील करु शकता.