Baby Names on Nakshatra : 'अश्विनी' नक्षत्रावरुन मुला-मुलींची नावे आणि अर्थ

Baby Names And Meaning : मुलांना त्यांच्या जन्म नक्षत्रावरुन नावे ठेवल्यास त्यांची पर्सनॅलिटी आणि जीवन अतिशय सुखकर होतं. आज 'अश्विनी' नक्षत्रावरुन मुला-मुलींची नावे आणि अर्थ समजून घेऊया. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Apr 6, 2024, 11:14 AM IST
Baby Names on Nakshatra : 'अश्विनी' नक्षत्रावरुन मुला-मुलींची नावे आणि अर्थ title=

बाळाचे नाव ठेवताना वेगवेगळ्या पर्यायांचा विचार केला जातो. वेगवेगळे ट्रेंड देखील बाळांच्या नावांसाठी फॉलो केले जाते. असं असताना सर्वात उत्तम पर्याय म्हणजे नक्षत्र किंवा जन्म नक्षत्रानुसार बाळाची नावे ठेवणे. जन्मतारा हा एकतर ग्रह, तारा किंवा नक्षत्र असतो जो मुलाच्या जन्मादरम्यान प्रबळ होतो. ज्योतिषशास्त्र सांगते की, हा जन्मतारा मुलाच्या चरित्र आणि जीवनातील घटनांवर खूप प्रभाव पाडतो. त्यामुळे, काही पालकांनी आपल्या बाळासाठी नक्षत्र नावाला प्राधान्य देणे स्वाभाविक आहे. तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असल्यास जन्म ताऱ्यांवर आधारित बाळाच्या नावांच्या यादीचा विचार करायला काहीच हरकत नाही. 

नक्षत्र किंवा जन्म नक्षत्र म्हणजे काय?

नक्षत्र हे भारतीय ज्योतिषशास्त्र तयार करणारे तारे चिन्ह आहेत. जेव्हा चंद्र आकाशातून प्रवास करतो, तेव्हा तो 27 विभाग किंवा 'चंद्र घरे' पार करतो असे मानले जाते, प्रत्येक घरात एक प्रमुख तारा किंवा नक्षत्र असतो. या 27 चंद्र घरांना भारतीय ज्योतिषशास्त्रात नक्षत्र म्हणून ओळखले जाते, प्रत्येक चंद्र घराला त्याचे नाव प्रबळ ताऱ्यावरून मिळाले आहे.

मुलांची नावे जन्मतारखेनुसार का ठेवावे?

हिंदू व्यक्तींचा असा विश्वास आहे की, नक्षत्र त्यांच्या बाळाचे जीवन, चारित्र्य आणि नशीब घडविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. प्रत्येक नक्षत्रात काही विशिष्ट अक्षरे असतात जी बाळासाठी भाग्यवान मानली जातात. पालक त्या विशिष्ट ध्वनी किंवा अक्षराने सुरू होणारे नाव निवडू शकतात. कुटुंबासाठी बाळाचे हे नाव नशिबवान ठरेल. 

अश्विनी नक्षत्र म्हणजे काय 

अश्विनी नक्षत्र, मेष राशीमध्ये पसरलेले, भारतीय ज्योतिषशास्त्रातील 27 नक्षत्रांपैकी पहिले नक्षत्र आहे. नक्षत्राचे नाव अश्विनी नक्षत्रावरून पडले आहे. ज्यामध्ये तीन तारे आहेत. अश्विनी केतूच्या प्रभावाखाली आहे. या टप्प्यावर चंद्राचा मार्ग ओलांडतो आणि सूर्याखाली जातो. अश्विनी नक्षत्रात जन्मलेले लोक सौम्य व्यक्तिमत्त्वाचे असतात आणि ते जे काही करतात त्यात कुशल असतात.

'अश्विनी' नक्षत्रावरुन मुलांची नावे-अर्थ

चेतन - उत्साहाचा झरा
लक्ष्य - लक्ष्य
ललप - शुभ चिन्हे
लावयांश - प्रेम, प्रेेमाची भावना
लाविश - श्रीमंत 
लावण्य - सौंदर्य
लार्शन - शांतता
चेतक - विचार पूर्वक
लाहित - दगडी भिंत
लक्षित - टार्गेट

'अश्विनी' नक्षत्रावरुन मुलींची नावे-अर्थ

चेष्टा - इच्छा
चेतना - लक्ष्य, जीवन
लालिमा - आनंदी व्यक्तिमत्त्व 
लावण्य - सौंदर्या
लक्षन्या - सुंदर
लक्षिता - लक्ष्य केंद्रीत करणारी
लक्ष्मी - देवी
ललिका - प्रेमळ व्यक्ती
लतिका - आनंदी व्यक्तीमत्त्व
लावणिका - सौंदर्य