How to Take Care of Tulsi Plant: तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. यामुळे अगदी प्रत्येक  हिंदू घरांमध्ये तुळशीचे रोप लावले जाते. तुळशीचे रोप हे फक्त धर्माशी समबंधित नाही. 
तुळशीच्या रोपाला औषधाचा दर्जा मिळालेला आहे. हे रोप आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर आहे. पण अनेकदा लोकांची समस्या ही असते की त्यांच्या घरातील तुळशीचे रोप पुन्हा पुन्हा सुकते. खूप काळजी घेऊनही जर तुमचे तुळशीची रोपे सुकत असेल तर आम्ही तुम्हाला आज काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमची तुळस हिरवी ठेवू शकता. चला टिप्स बघुयात. 


तुळशीसाठी माती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुळशीच्या रोपाच्या योग्य वाढीसाठी माती उत्तम असणे महत्त्वाचे आहे. 70 टक्के माती आणि 30 टक्के वाळूमध्ये तुळशीचे रोप लावा, यामुळे तुळशीचे रोप कुजत नाही आणि दीर्घकाळ हिरवेगार राहील.


कोणते खत टाकावे? 


केमिकलयुक्त खतांपेक्षा नेहमी शेणखत वापरा. तुळशीसाठी शेणखत उपयुक्त आहे. परंतु शेणखत असेच टाकू नका, तर ते वाळवून त्याला बारीक करून टाका. यामुळे तुळशीचे रोप प्रत्येक ऋतूत हिरवेगार राहील आणि झाडाला भरपूर पाने येतील. 


कुंडी कशी असावी?


तुळशीसाठी कुंडीचे तोंड रुंद आणि भांडे खोल असावे. कुंडीच्या तळाशी दोन छिद्रे करा आणि तळाशी कागदाचा तुकडा किंवा घागराचा तुकडा ठेवा, त्यानंतर कंपोस्ट आणि वाळूसह माती घाला.


पाणी देताना 'हे' लक्षात ठेवा 


तुळशीचे रोप लावताना हे लक्षात ठेवा की त्याला जास्त पाणी देऊ नका, जास्त पाणी दिल्याने तुळशीच्या मुळांमध्ये बुरशीची वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे हिवाळ्यात ४-५ दिवसांतून एकदा पाणी टाकावे लागते.



(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)