Parentig Tips : आपल्या देशात आजही सेक्स सारख्या मुद्द्यांवर आजही मोकळेपणाने बोलले जात नाही. आई-वडिलच काय तर शाळेतही याबाबत योग्य ते शिक्षण दिलं जात नाही. अशावेळी अर्ध्या ज्ञानामुळे मुलं या सगळ्या गोष्टींकडे आकर्षित होतात. अशावेळी पालकांनी ही परिस्थिती कशी हाताळावी हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण पालकांना पॉर्नोग्राफीबद्दल मुलांशी बोलणे अवघडल्यासारखे वाटू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलं आता डिजिटल जगाशी खूप लवकर जोडले जातात. एवढंच नव्हे तर त्यांना या सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध होतात. अशावेळी अनेक मुलांना खूप कमी वयात पॉर्न व्हिडीओ पाहण्याची सवय लागते. तेव्हा पालकांनी ही परिस्थिती कशी हाताळावी हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. 


आज प्रत्येक मुलाकडे स्मार्ट गॅजेट्स आहेत. त्यामुळे चुकीच्या मार्गावर ही मुलं लगेच भरकटत जातात. रिसर्चनुसार मुलं किंवा मुली जास्त करुन 11 ते 14 वयापर्यंत पहिल्यांगा पॉर्न 
पाहतात. अशावेळी जर पालकांना याबाबत माहिती मिळाली तर पॅरेट्ंस लगेच मुलांवर रागावतात आणि चिडतात देखील. अशी परिस्थिती खूप शांतपणे हाताळणे गरजेची असते. 


प्रेमाने आणि शांतपणे समजवा 


जर तुमचं मुलं देखील पॉर्न पाहाताना पकडलं गेलं असेल तर अजिबातच घाबरू नका. आपल्या मुलाला अतिशय प्रेमाने आणि शांतपणे हँडल करा. खऱ्या आणि खोट्या जगातील फरक त्याला समजावून सांगा. त्यांना हे समजावून सांगा की, ते जे बघत आहेत ते एक आभासी आणि खोटं जग आहे. जर मुलाला सेक्सबद्दल माहिती हवीच असेल तर ती त्याने योग्य पद्धतीने घेणे गरजेचे आहे. पॉर्न व्हिडीओ हा त्यासाठी योग्य मार्ग नाही. 


मुलासाठी कायम राहा उपलब्ध 


हल्ली सिंगल चाईल्डच सगळ्या घरात पाहायला मिळतात. त्यामध्ये पण दोन्ही पालक कामाला जातात. अशावेळी पालक म्हणून तुम्ही मुलांसाठी उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. एकटी असलेली मुलं मोबाईलवर अधिक वेळ घालवतात. अशावेळी पालकांनी मुलांना अधिक वेळ देणे. त्यांचा दिनक्रम जाणून गेणे गरजेचे आहे. कारण मुलं एकटी असली की, नेट सर्फिंग करत राहतात. अशावेळी पालकांनी मुलांना पडणाऱ्या प्रश्नांना तुम्ही उत्तर देण्यासाठी उपलब्ध असाल. 


मुलांना मोकळं होऊ द्या 


पालकांनी मुलांशी संवाद साधायला हवा. हा संवाद उपदेशाचा किंवा चौकशीचा होणार नाही याची विशेष काळजी घ्या. या वयात मुलांना अनेक प्रश्न पडत असतात. मग ते आपल्या शरीराबद्दल असोत किंवा वैचारिक असोत. पण तेव्हा तुम्ही ते शांतपणे सोडवा. कारण मुलं जितकी मोकळी तुमच्याशी या वयात होतील तेवढी चांगली. कारण या वयात मुलं अनेकदा पालकांशी या विषयांवर बोलायला घाबरतात. 


चुकूनही रागवू नका 


एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार, जर तुमचं मुलं पॉर्न पाहताना तुम्ही पाहिलं तर चुकूनही रागवू नका. कारण रागवल्यामुळे परिस्थिती बिघडते. अशावेळी अनेक पालक इंटरनेट ब्लॉक करणे गॅजेट्स काढून घेणे यासारख्या चुका करतात. यामुळे मुलं अधिक चुकीचं वागू लागतं. शिस्तीने न वागता पालकांनी मुलांशी शांतपणे संवाद साधावा.