Hugging Benefits In Marathi: सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. आज प्रेमाचा आठवड्याचा सहावा दिवस म्हणजे हग डे साजरा करण्यासाठी प्रेमी तयारी करत आहेत. हग जे 12 फेब्रुवारीला साजरा केला जातो. 'हग डे ला' प्रेमी युगुल एकमेकांना मिठी मारुन आपलं प्रेम व्यक्त करत असतात. तुमच्या प्रिय व्यक्तीचा राग दूर करायचा असेल तर त्याला मिठी मारा. यामुळे तुमचे नाते आणखी घट्ट होईल. तुम्ही तुमचे मित्र, कुटुंब, नातेवाईक आणि जोडीदाराला ही मिठी मारू शकता. मिठी मारणं म्हणजे एकप्रकारचं आपले प्रेम स्पर्शाने व्यक्त करणे. दोघांमध्ये सामंजस्य निर्माण करण्याचा आणि प्रेम वाढवण्याचा हा एक उत्तम मार्ग असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सहसा जेव्हा तुम्ही एखाद्याला खूप दिवसानंतर भेटता तेव्हा तुम्ही त्याला मिठी मारता. तुम्ही तुमच्या मित्रांच्या आणि तुमच्या हृदयाच्याजवळ असलेल्यांना मिठी मारता. पण तुम्हाला माहित आहे का मिठी मारणे म्हणजे केवळ प्रेमाचे प्रतिक नसून त्याचे काही आरोग्य फायदे देखील आहेत. मिठी मारण्यामागेचे अनेक फायदे आहेत जे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी चांगले आहेत. विज्ञानानुसार, जेव्हा तुम्ही रोज एखादी तरी मिठी मारला तरी तुम्हाला त्याचे काही अनोखे फायदे मिळतात. 


मूड चांगला राहतो


मिठी मारल्याना तुमचा मूड फ्रेश राहू शकतो. खरं तर, जेव्हा तुम्ही मिठी मारतात तेव्हा तुमचा मेंदू जास्त सेरोटोनिन हार्मोन्स तयार करतो. यामुळे तुमचा मूड चांगला राहतो. याशिवाय मिठी मारल्याने दिवसभर काम करण्याची क्षमता वाढते.


तणाव कमी होतो


तुमच्या खास व्यक्तीला मिठी मारुन स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसोलची पातळी कमी होते. मिठी मारल्याने तणाव कमी होते. तसेच व्यक्तीची स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. म्हणूनच, जर तुम्हाला जीवनात तणाव वाटत असेल तर तुमच्या प्रिय व्यक्तीला एक मिठी द्या. 


मानसिक आरोग्य चांगलं राहतं


जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला नेहमी मिठी मारत असेल तर याचा अर्थ तुम्ही दोघेही प्रत्येक परिस्थितीत एकमेकांची काळजी घेत असाल. त्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य बदलते.


हृदयासाठी फायदेशीर


मिठी मारल्याने शरीरात लव्ह हार्मोन ऑक्सीटोसिनची पातळी वाढते. यामुळे हृदय निरोगी राहते. इतकेच नाही तर मिठी मारल्याने रक्तदाबही कमी होतो. यामुळे लोक अनेकदा आपल्या पार्टनरला मिठी मारतात, त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहतो.


आत्मविश्वास वाढतो


मिठी मारल्याने आत्मविश्वास वाढतो. समोरच्या व्यक्तीला सुरक्षित वाटते. मिठी मारल्याने लोकांमध्ये विश्वास दृढ होतो आणि परिणामी एकमेकांमधील नाते अधिक घट्ट होते.