आपला जोडीदार सोडून तुम्ही इतर व्यक्तीकडे आकर्षित होणे ही सामान्य बाब आहे. पण यामध्ये चुकीचे वागणे ही एक चॉईस असते. लेखक सीमा आनंद यांनी सोशल मीडियावर सामान्य गोष्टीवर मार्गदर्शन केलं आहे. अनेकदा आपण मित्राच्या पत्नीकडे आकर्षित होत असल्याची तक्रार करतात. या समस्येवर उपाय काय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीमा आनंद यांनी एक उदाहरण दिले आहे. 12 वर्षांचा संसार, दोन मुले असलेला एक व्यक्ती आपल्या मित्राच्या पत्नीकडे आकर्षित होतो. मला समोरच्या महिलेमधील अनेक गुण आवडतात. जसे की, समजूतदारपणे, तिची कपड्यांची चॉईस, विचार करण्याची पद्धत. मला त्या व्यक्तीला पण गमावायचं नाही. तसेच माझ्या पत्नी आणि मुलांचा देखील मनात विचार येतो.  अशावेळी नेमकं काय करायला पाहिजे. यावर रिलेशनशिप तज्ज्ञ सीमा यांनी मार्गदर्शन केलंय. 


सिमा आनंद यांच्या टिप्स



या परिस्थितीवर रिऍक्ट करु नका 
प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात कधी ना कधी या परिस्थितीतून जातात. महत्त्वाचं म्हणजे एकदा नव्हे अनेकदा ही समस्या त्यांना सतावत असते. पण प्रेम एकदाच होते. सतत या गोष्टींवर विचार करणे योग्य नाही, असं सिमा आनंद सांगतात. 


तुमचं लग्न महत्त्वाचं 
जेव्हा ती व्यक्ती आपल्या मित्राच्या पत्नीकडे आकर्षित होतो. तेव्हा त्याने हा विचार केला पाहिजे की, त्याच्यासाठी लग्न अतिशय महत्त्वाचे आहे. मैत्रीपेक्षा लग्न अतिशय महत्त्वाचं आहे. अशावेळी तुमच्या मनात अशा भावना येत असतील तर तुम्ही तुमचं लग्न, तुमचा जोडीदार आणि मुलांचा विचार करा. 


आकर्षणामुळे पत्नी गमवू नका 
अनेकदा जीवनात अशा येणाऱ्या प्रसंगामुळे आपण आपला जोडीदार गमावू शकतो. अशावेळी आपली भावना रोखून एक पाऊल मागे येणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या पत्नीमधील सकारात्मक बाजू आठवा. आतापर्यंत तिने तुम्हाला दिलेली साथ देखील तितकीच महत्त्वाची आहे. 


कारणे शोधू नका 
अशा परिस्थितीमध्ये आपण समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा विचार करता. पण तज्ज्ञ सांगतात की, अशा परिस्थितीत कारणे शोधू नका. ते तुमच्या खासगी आयुष्यासाठी घातक ठरतात. कारण त्या महिलेचा पती तिला सन्मान देत नाही किंवा तो तिला मारतो, ही कारण आपण शोधत असल्याचं अधोरेखित होते.