Indian Baby Boy Names on Lord Ram Dussehra : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा दसरा हा सण आहे. या दिवशी सगळीकडे मंगल आणि पवित्र वातावरण असतं. चर्तुमासातील दसरा हा सण आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांनंतर हा सण साजरा केला जातो. दसरा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. तसेच प्रभू रामाने दसऱ्याच्या दिवशी रावणाचा वध करून विजय मिळवला होता. दसऱ्याच्या दिवशी वाईट गोष्टींचा नाश करून सकारात्मक गोष्टी स्वीकारल्या जातात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकजण प्रभू रामाचे भक्त असतात. आपल्या मुलावर कायम प्रभू रामाचा आशिर्वाद असावा असं वाटत असत, अशा व्यक्तीने मुलांना प्रभू रामचंद्राच्या नावावरून मुलांची नावे द्यावीत. प्रभू रामचंद्राच्या नावावरून मुलांसाठी ठेवा युनिक आणि पवित्र नावे, ज्याचा अर्थही असेल खास. 


अविराज: अविराज हे भगवान रामाच्या अनेक नावांपैकी एक आहे. आजच्या आधुनिक दृष्टिकोनातून बघितलं तर ते एक अतिशय अनोखं नाव आहे. अविराज म्हणजे सूर्याप्रमाणे चमकणारा. जर तुम्हाला तुमच्या मुलाचे नाव भगवान रामाच्या नावावर ठेवायचे असेल तर हा एक चांगला पर्याय असू शकतो.


मानविक: हे भगवान रामाचे एक नाव आहे. तुमचा मुलगा हुशार, दयाळू आणि देवावर विश्वास ठेवणारा बनवायचा असेल तर तुम्ही तुमच्या मुलाचे नाव मानविक ठेवू शकता.


विराज: विराज हे प्रभू रामाच्या अनेक नावांपैकी एक आहे, भगवान राम हे सूर्यवंशी होते, म्हणून त्यांना सूर्याचा राजा देखील म्हटले जाते आणि या नावाचा अर्थही तोच आहे. आधुनिक युगाच्या अनुषंगाने पाहिले तर ते एक अतिशय वेगळे नाव आहे.


शाश्वत: सनातन धर्माचे दुसरे नाव शाश्वत आहे आणि हे राजारामाचेही नाव आहे. हे नाव जेवढे अद्वितीय आहे तेवढेच त्यात वेगळेपण आहे. म्हणून आपण आपल्या मुलाचे असे नाव ठेवू शकता.


अद्वैत: अद्वैत हे भगवान रामाचे नाव आहे. तुम्ही तुमच्या मुलाचे हे नाव ठेवू शकता. या नावाचा अर्थ अविश्वसनीय आहे किंवा त्याच्यासारखा कोणीही नाही.


अथर्व: चार वेदांपैकी एक अथर्व आहे आणि ते भगवान रामाचे नाव देखील आहे. या नावाचा अर्थ वेदांचा जाणता, असे आहे.


ब्रम्हज्ञ : या नावाचा अर्थ ‘देवांचा देव’, ज्याला सर्व ज्ञान प्राप्त आहे असा. रामचंद्र हा भगवान विष्णूचा अवतार समजण्यात येतात.


धन्विन : अर्थात सूर्याच्या किरणांपासून जन्मलेला असा याचा अर्थ होतो. सूर्यासारखा तेजस्वी पुत्र, धैर्यवान आणि कणखर पुत्र म्हणजे धन्विन. 


शाश्वत : जगातील एकमेव सत्य म्हणजे प्रभू. सत्य म्हणजे शाश्वत. रामाचाच दुसरा अर्थ शाश्वत असे म्हटले जाते. तुमच्या बाळासाठी हे नाव तुम्ही निवडू शकता.  


वेदात्म: वेदाचा सर्वस्वी आत्मा म्हणजे वेदात्म. प्रभूचा आत्मा वेदात नसेल तर त्याला काहीच अर्थ राहणार नाही असा वेदात्म या नावाचा अर्थ आहे.