Navratri 2023 : नवरात्र सुरु झाली आहे. 15 ऑक्‍टोबर 2023 ते 24 ऑक्‍टोबर 2023 पर्यंत भक्त माँ दुर्गाच्‍या भक्तीत तल्लीन राहतील. माँ दुर्गा भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या दिवसात अनेकांच्या घरी लक्ष्मीचे आगमन कन्येच्या रूपात होते. असं म्हणतात की एखाद्याच्या नावाचा त्याच्या व्यक्तिमत्त्वावर खूप प्रभाव पडतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या मुलीचे नाव माँ दुर्गेच्या या नावांवर ठेवू शकता. माँ दुर्गेच्या नवीन रूपांपैकी एकाचे नाव शैलपुत्री आहे. यासारखेच एक नाव आहे शैला. शैला म्हणजे डोंगरात राहणारी. हे नाव खूप आधुनिक वाटतं.


मुलींना नावे निवडताना खालील नावांचा नक्की विचार करा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्षेम्या 
देवी दुर्गेचे नाव आहे क्षेम्या. सगळ्यांचे कल्याण करणारी 


ओशि 
ओशि हे नाव मुलींसाठी अतिशय शुभ मानले जाते. याचा अर्थ आहे दिव्या.  


अनाभ्रा 
अनाभ्रा हे देखील तीन अक्षरी नाव आहे. याचा अर्थ आहे विचारशील 


आद्या 
वैष्णोदेवीचे नाव आहे आद्या असे आहे. या नावाचा अर्थ लेकीसाठी असेल अतिशय शुभ. 


अन्विता 
देवी दुर्गेचे नाव आहे अन्विता. ज्याचा अर्थ आहे अतिशय चांगले गुण. 


अनिका 
देवी दुर्गेचे नाव आहे अनिका. लेकीसाठी हे नाव ठेवलात तर राहिल कृपाशिर्वाद. 


इप्सिता 
या नावाचा अर्थ आहे अभिलाषा. जर तुम्ही लेकीसाठी हटके नावाचा विचार करत असाल तर या नावाचा नक्की विचार करा. 


ऊर्जा 
लेकीसाठी आई दुर्गेच्या नावाशी संबंधीत या नावाचा विचार करा. या नावाने लेकीच्या जीवनात राहील सकारात्मक ऊर्जा


उबिका 
देवी दुर्गेचे हे नाव आहे. ज्याचा अर्थ आहे प्रगती. उबिका या नावाचा मुलीसाठी विचार नक्की करू शकता. 


एकादा
आई दुर्गेचे हे नाव आहे. प्रथम असा याचा अर्थ आहे. एकादा मुलीसाठी नक्की निवडा हे नाव.