Kitchen Tips : भारतामध्ये जसजसे जिल्हे बदलत जातात त्याप्रमाणं खाद्यपदार्थांचे प्रकार आणि ते बनवण्याची पद्धतही बदलत जाते. भाषेपासून अगदी खाद्यसंस्कृतीपर्यंत विविधतेनं नटलेल्या या भारत देशात अनेकांच्याच आहाराचा अविभाज्य भाग असणारा एक घटक म्हणजे डाळ. पप्पू चारू, पप्पू, चारू, डाळ, दाल, कढी या आणि अशा अनेक नावांनी डाळ ओळखली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हल्लीच्या दिवसांमध्ये किंबहुना जेव्हापासून कुकरचा वापर नेमका कसा करावा हे ज्ञात झालं तेव्हापासूनच भारतात अनेकांनीच या कुकरचा वापर सुरू केला. पण,  वारंवार कुकरमध्ये शिजलेली डाळ खाणं कितपत फायद्याचं? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता का? वाफेच्या दाबामुळं शिजलेल्या अन्नपदार्थांच्या सेवनानं अपचन आणि बद्धकोष्टतेची समस्या सतावते. त्यामुळं काही प्रसंगी प्रेशर कुकरमध्ये शिजवलेलं अन्न आरोग्यास धोकादायक ठरू शकतं. 


कुकरमध्ये शिजवलेल्या अन्नामुळं रोगप्रतिकारक शक्तिवर परिणाम होऊन त्यामुळं पोट फुगलेलं वाटणं, पोट जड वाटणं, सतत अपचन होणं या आणि अशा समस्या सतावतात. तर, मग प्रेशर कुकरमध्ये डाळी शिजवाव्यात की नाही? 


हेसुद्धा वाचा : टाटा विरुद्ध अंबानी 2.0: ईशा अंबानीला टक्कर देणार 32 वर्षीय तरुण; नात्यानं रतन टाटांचा... 


डाळीमध्ये प्युरिनचं प्रमाण अधिक असतं, ज्यामुळं शरीरात युरिक अॅसिडचं प्रमाण वाढत नाही. अनेक जाणकारांच्या मते कुकरमध्ये डाळ शिजवल्यानं त्यातील युरिक अॅसिडचं प्रमाण वाढून शरिरावर त्याचे परिणाम दिसून येतात. पण, अद्यापही या दाव्यातील सत्यता सिद्ध झालेली नाही. तरीही एखाद्या व्यक्तीला युरिक अॅसिड संबंधित शारीरिक व्याधी असल्यास त्यांनी प्रेशर कुकरमधील डाळीसंदर्भात डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांशी संवाद साधणं उत्तम पर्याय. 


प्रेशर कुकरमध्ये 'हे' पदार्खथ शिजवणं टाळा 


भात- प्रेशर कुकरमध्ये भात बनवल्यामुळं या प्रक्रियेत तांदुळातील स्टार्च एक्रिलामाइड नावाचं एक रसायन सोडतं, जे आरोग्यासाठी घातक ठरतं. 


बटाटा - तांदळाप्रमाणं बटाट्यामध्येही स्टार्चचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळं प्रेशर कुकरमध्ये बटाटा शिजवणंही टाळावं 


प्रेशर कुकरमध्ये पास्ता, मासे आणि भाज्याही न शिजवण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. असं केल्यानं या पदार्थांमध्ये असणारी पोषक तत्त्वं नष्ट होतात असं सांगितलं जातं.  


(वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)