आमंत्रण नसताना लग्नात फुकट जेवणाऱ्यांना तुरुंगवास! भारतीय कायद्यातील तरतूद पाहून बसेल धक्का
Uninvited People Who Eats Free Food At Wedding: हल्ली अनेकदा मोठ्या हॉटेलमध्ये आयोजित केलेली लग्नं, रिसेप्शन किंवा पोस्ट वेडिंग पार्टींमध्ये मोठ्या संख्येनं लोक हजेरी लावतात. यामध्ये आमंत्रण नसलेल्यांचाही समावेश असतो. पण असं आमंत्रण नसताना लग्नात जेवणं महागात पडू शकतं.
Uninvited People Who Eats Free Food At Wedding: लग्नसमारंभांचा सिझन सुरु असून तुमच्यापैकीही अनेकजण सध्या या ना त्या लग्नाला उपस्थिती लावत असाल. अगदी हळदी-कुंकू नाही तर गृहप्रवेश, शांती, पूजा, सत्यनारायणाची पूजा यासारख्या आमंत्रणांचं प्रमाण वाढलं आहे. अनेक शुभ कार्य सध्या पार पाडली जात आहेत. मात्र लग्नाबद्दल बोलायचं झाल्यास जेवणाचा आवर्जून उल्लेख करावाच लागेल. अनेकदा तर वऱ्हाडी हे फक्त लग्नातील जेवण लक्षात ठेवतात असंही म्हटलं जातं. अनेकदा लग्नांमधील जेवण हे चर्चेचा विषय ठरतं. मात्र कधीतरी लग्नांमध्ये 'बिन बुलाऐ मेहमान' म्हणजेच आमंत्रण नसलेले अगंतुक लोकही हजेरी लावून जेवणावर ताव मारुन जातात. हे लोक ना मुलीकडून असतात ना मुलाकडून वाहत्या गंगेत हात धुवून घेऊयात म्हणत हे असे लोक जेवण आवडेल त्या लग्नाला हजेरी लावतात. त्यांचं खरं तर ना वरपक्षातील कोणाशी नातं असतं ना वधूपक्षातील कोणाशी.
आमंत्रण नसताना लग्नसमारंभात शिरुन जेवणावर ताव मारणाऱ्यांना...
हल्ली अनेकदा मोठ्या हॉटेलमध्ये आयोजित केलेली लग्नं, रिसेप्शन किंवा पोस्ट वेडिंग पार्टींमध्ये मोठ्या संख्येनं लोक हजेरी लावतात. मात्र येथील गर्दीचा फायदा असे आमंत्रण नसलेले, ओळखपाळख नसलेले लोक घेतात. न बोलावता कार्यक्रमांना येणाऱ्यांची संख्या कमी नाही. बऱ्याचदा हे असे लोक म्हणजे 'थ्री इडियट्स'मध्ये दाखवल्याप्रमाणे हॉस्टेलमध्ये राहणारी मुलं असतात. अनेकदा तर संपूर्ण कुटुंब काही ना काही ओळख काढून लग्नांमध्ये येऊन ताव मारुन जातं. लग्नातील जेवणावर ताव मारणे या एकमेव उद्देशाने ही अशी लोक आलेली असतात. तुम्ही सुद्धा असं कधी केलं असेल किंवा अशा लोकांना तुम्ही पकडलं असेल तर ही बातमी फार महत्त्वाची आहे. आमंत्रण नसताना लग्नसमारंभात शिरुन जेवणावर ताव मारणाऱ्यांना 2 ते 7 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते हे तुम्हाला ठाऊक आहे का?
कायदा काय सांगतो?
इन्स्टाग्रामवर वकील उज्वल त्यागी यांनी ओळख नसताना एखाद्या लग्नात किंवा सोहळ्यात फुकटात जेवल्यास काय कारवाई होऊ शकते? या प्रश्नाचं उत्तर दिलं. आमंत्रण नसताना लग्नाला जाणं हा कायद्याने गुन्हा आहे. असे लोक पकडले गेल्यास कलम 442 आणि 452 अंतर्गत अशा व्यक्तींना किमान 2 तर जास्तीतजास्त 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते. न बोलावता लग्नाला जाणं हे ट्रेसपासिंग करण्यासारखं आहे. त्यामुळेच या कलमांअंतर्गत कारवाई केली जाते.
लोक सुधारतील अशी अपेक्षा
या वकिलाने दिलेलं उत्तर ऐकून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. भारतात आमंत्रण नसताना आलेल्या पाहुण्याचाही सन्मान करण्याची पद्धत आहे. या व्हिडीओमुळे आणि शिक्षेच्या तरतुदीमुळे तरी लोक सुधारतील आणि अशाप्रकारे न बोलावता लग्नांना जाणं बंद करतील अशी अपक्षे अन्य एकाने व्यक्त केली आहे.