लोकप्रिय मराठमोळी जोडी खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा पालक झाले आहेत. 2 ऑक्टोबर रोजी खुशबू तावडे आणि संग्राम साळवी यांच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं. दुसऱ्यांदा कन्यारत्न झाल्यानंतर चाहत्यांना भरपूर आनंद झाला. या दोघांनीही लेकीच्या जन्मानंतर एक खास पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुशबू आणि संग्राम यांना पहिला मुलगा आहे. ज्याचं नाव 'राघव' असं आहे. राघव हा तीन वर्षांचा असून त्याला बहिण झाली आहे. आज खुशबू आणि संग्रामने बाळाचं नाव जाहीर केलं आहे. बऱ्याच दिवसांपासून यांच्या लेकीचं नाव काय असेल याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत होती. 


खुशबू तावडेची खास पोस्ट 


खुशबू तावडेने मुलीला 'राधी' असं नाव दिलं आहे. 'राधी' या नावाचा अर्थ आहे समाधान. राधी हे नाव अतिशय युनिक आणि नवं आहे. तसेच माफ करणे, इच्छाशक्ती असा देखील या नावाचा अर्थ आहे. खुशबूने लेकीला अतिशय गोड नाव दिलं आहे. 


पहिल्या मुलाचं नाव 



खुशबू तावडेच्या मोठ्या मुलाचं नाव राघव असं आहे. राघव या नावाचा अर्थ आहे 'रामाचा वंशज', 'रघुचा मुलगा'. राघव हे नाव देखील युनिक आणि अनोखं असं आहे. खुशबू आणि संग्राम या दोघांनीही मुलांची नाव ही 'र' अक्षरावरुन ठेवली आहेत. 


होतंय कौतुक 


खुशबू आणि संग्रामच्या या पोस्ट खाली अनेक चाहत्यांनी कमेंट केली आहे. अनेकांनी पालक म्हणून या दोघांचं कौतुक केलंय. तर काहींनी नाव आवडल्याची माहिती दिली. 


'र' अक्षरावरुन मुलींची नावे 


रिजुता 
पापविरहित मनाची स्त्री असा 'रिजुता' या नावाचा अर्थ होतो. तुम्हीही तुमच्या मुलीसाठी 'रिजुता' नाव निवडून वेगळ्या नावाची निवड करू शकता. उच्चारायला आणि लक्षात ठेवण्यासाठीही हे अत्यंत सोपे नाव आहे.


रन्विथा 
अत्यंत आनंद, अत्यानंद, कायम आनंदी राहणारी अशी 'रन्विथा' या नावाचा अर्थ आनंद असा होतो. जिच्या जन्मामुळे घरात आनंद पसरला आहे अशी 'रन्विथा'. 


रमणा 
आकर्षक, अत्यंत सुंदर, आकर्षक दिसणारी स्त्री, सौंदर्यवती असा 'रमणा' या नावाचा अर्थ होतो. 'रमणा' हे नाव वेगळे आणि युनिक असून पूर्वीच्या काळी या नावाचा उपयोग होत असे. 


रक्षिता 
एखाद्याचे रक्षण करणारी, रक्षण करणारी अशी स्त्री असा 'रक्षिता' नावाचा अर्थ होतो. तुमच्या घरात आलेली लक्ष्मी ही तुमचे कायम रक्षण करणारी आहे असं तुम्ही मानत असाल तर आपल्या मुलीसाठी 'रक्षिता' या वेगळ्या नावाचा वापर तुम्ही करून घेऊ शकता.


राजवी 
राणी, राणीप्रमाणे थाट असणारी, राजाची राणी असा 'राजवी' या नावाचा अर्थ होतो. नेहमीच्या त्याचत्याच नावांचा कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा राजघराण्याला शोभेल अशा रॉयल नावाची निवड करू शकता. 


रजिषा 
चंद्र, चंद्राचा भाग अर्थात रजिषा. हे अगदीच वेगळं आणि युनिक असं मुलीचं नाव आहे. चंद्राप्रमाणे सुंदर असणारी अशी रजिषा असाही याचा अर्थ तुम्ही घेऊ शकता. 


राजसी 
दुर्गेच्या नावापैकी एक नाव, देवीचे नाव, राजाची राणी, राजाप्रमाणे राहणारी अर्थात राजकन्या असा 'राजसी' नावाचा अर्थ होतो. तुमच्या घरी अनेक वर्षांनी जर मुलीचा जन्म झाला असेल तर नक्कीच हे युनिक नाव तुमच्या मुलीसाठी तुम्ही निवडू शकता. 


रायमा 
अत्यंत आनंदी, नेहमी खूष राहणारी अशी असा 'रायमा' या नावाचा अर्थ होतो. बरेचदा 'रायमा' हे नाव बंगालीमध्ये वापरण्यात येते. मात्र तुम्हाला वेगळ्या नावाची इच्छा असेल तर तुम्ही 'रायमा' या नावाची निवड आपल्या मुलीसाठी करू शकता.


रचिता 
जग निर्माण करणारी असा 'रचिता' या नावाचा अर्थ होतो. तुमच्या घरी आलेल्या गोंडस परीसाठी 'र' आद्याक्षरावरून हे वेगळं आणि युनिक असं नाव तुम्ही निवडू शकता.