Kitchen Cleaning Tips in Marathi: स्वयंपाकघरात काम करताना नेहमीच स्वच्छता राखली जाते. कारण ती अन्न शिजवण्याची जागा आहे. जर तिथे अस्वच्छता असेल तर जेवणातून पोटात जाण्याचीही शक्यता असते. त्यामुळं वारंवार आजारी पडू शकतात. हे सर्व टाळण्यासाठी किचनमधील स्वच्छता खूप महत्त्वाची ठरते. पण अनेकदा किचनच्या ओट्यावर डाग पडतात. कितीही स्वच्छ केले तरी ते डाग जात नाहीत. अशावेळी घरगुती वस्तुंच्या मदतीने तुम्ही किचनचा ओटा स्वच्छ करु शकता.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किचन स्वच्छ असेल तर आपले आरोग्यही निरोगी राहते. किचनच्या ओट्याचा वापर अनेक कामांसाठी केला जातो. अनेकदा किचनच्या ओट्यावरच भाजी कापली जाते किंवा ओट्यावरच कणिकही मळली जाते. त्यामुळं या खाद्यपदार्थांचे डाग तिथे राहतात. मग कितीही प्रयत्न केले तरी हे डाग काही निघत नाहीत. अशावेळी या चार टिप्सच्या मदतीने तुम्ही किचनमधील ओटा स्वच्छ करु शकता. 


बेकिंग सोडा हे किचनचा ओटा स्वच्छ करण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. कारण बेकिंग सोडामध्ये अॅसिड असते. त्यामुळं ओट्यावर पडलेला तेलकट थर किंवा मसाल्याचे डाग स्वच्छ करणे सोप्पे होतेय. 


बेकिंग सोडा कसा वापरावा


एका भांड्यात 2-3 चमचे बेकिंग सोडा घ्या नंतर त्यात थोडे कोमट पाणी टाका. आता हे मिश्रण एकत्र करुन घ्या. ही पेस्ट संपूर्ण ओट्यावर लावावी आणि 5- 10 मिनिटे ही पेस्ट अशीच ठेवावी. नंतर कोमट पाण्याने किंवा स्वच्छ कापडाने पुसून घ्यावे. 


दुसरी पद्धत


एका स्प्रेच्या बॉटलमध्ये 1 चमचा बेकिंग सोडा, 1 लिंबाचा रस आणि 1 कप कोमट पाणी यांचे मिश्रण तयार करा. आता ओट्यावर हे मिश्रण शिंपडा आणि काही वेळासाठी तसंच ठेवा. नंतर, ब्रशच्या सहाय्याने ओट्यावर पडलेले डाग स्वच्छ करा. जेव्हा सर्व डाग निघतील तेव्हा एका कपड्याने स्वच्छ पुसून घ्या. 


ओट्यावरील डाग स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि खाण्याचा सोडाही वापर शकता. लिंबू आणि खाण्याचा सोडा या दोन्ही गोष्टी घरात उपलब्ध असतात. एक छोट्या कपभर पाण्यात 1 चमचा खाण्याचा सोडा मिसळा आण एका लिंबाचा रस टाकून हे मिश्रण तेल पडलेल्या डागांवर लावा. नंतर एका कपड्याने ओटा स्वच्छ करुन घ्या. तेलाचा डाग खूपच चिकट असेल तर अर्ध कापलेल्या लिंबावर खाण्याचा सोडा लावून तो थेट तेलाच्या डागावर रगडा, यामुळं सहज डाग निघतील.