कांदा महिनाभर साठवून ठेवा अजिबात सडणार नाही, `या` टिप्स मिटवतील तुमचे टेन्शन
How To Store Onions: कांद्याचा वापर दररोजच्या जेवणात केला जातो. मात्र कांद्याचे दर चढ-उतार होत असताना कांदा तुम्ही महिनाभरही साठवून ठेवू शकता.
How To Store Onions: पदार्थांची लज्जत वाढवण्यासाठी कांदा खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. प्रत्येक घरात कांदा वापरला जातोच. कांद्याची फोडणी देऊन केलेला पदार्थ जास्त चविष्ट लागतो. त्याचबरोबर, काही गृहिणी पदार्थांमध्ये कांदा-खोबऱ्याचे वाटणही टाकतात. कधी घरातील कांदे संपले तर जेवणाचे वांदे होतात. कारण कांद्याशिवाय जेवणच अपूर्ण आहे. अशा समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून अनेकजण महिनाभरासाठीचा कांदा आधीच साठवून ठेवतात.
हवामान बदलाचा फटका कांद्यांवर पण पडतो. अशातच हिवाळा आणि गरमीच्या दिवसांत कांदा सडतो आणि जास्त आद्रता आणि उष्णता असल्यास कांदा सडण्यास व खराब होण्यास सुरुवात होते. अशावेळी तुम्हाला दीर्घकाळ कांदा ताजे ठेवण्यासाठी या टिप्सनुसार आत्ताच साठवून ठेवा.
थंड व सूर्यप्रकाशापासून लांब ठेवा
कांदा दीर्घकाळ फ्रेश ठेवण्यासाठी नेहमी थंड व ड्राय प्लेसवर ठेवून द्या. कांद्यांना थोडे जरी पाणी लागले तरी ते सडून जातात. तसंच, थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात ठेवू नका. कारण यामुळं कांद्यांना बुरशी लागू शकते.
तापमान किती असावे
कांदा नेहमी 4-10 डिग्री सेल्सियसवर स्टोअर करायला हवा. यामुळं कांद्याचे टेक्सचर बिघडत नाही आणि दीर्घकाळासाठी फ्रेश राहतात.
टिश्यूमध्ये गुंडाळून ठेवा
कांदा दीर्घकाळ स्टोअर करण्यासाठी हवं तर तुम्ही टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून ठेवू शकता. लक्षात घ्या की कांदा कधीच प्लास्टिकच्या पिशवीत ठेवू नका. कारण प्लास्टिकच्या पिशवी आद्रता जमा होते त्यामुळं कांदा सडण्याची शक्यता असते. या व्यतिरिक्त तुम्ही मॅश बॅग वापरु शकता.
या चुका अजिबात करु नका
फ्रीजमध्ये ठेवल्यावर पदार्थ जास्त काळ टिकतात. पण कांद्याच्या बाबतीत ही चूक करु नका. कांदे कधीच फ्रीजमध्ये स्टोअर करु नका. कारण फ्रीजमध्ये कांदे ठेवल्यास ते ओलावा शोषून घेतात आणि लवकर खराब होतात.
कांदे निवडताना काळजी घ्या
तुम्हाला सहा महिने किंवा वर्षभरासाठी कांदा साठवून ठेवायचा असेल तर बाजारातून कांदे खरेदी करताना नेहमी मोठे आणि कोरडे साल असलेले कांदे निवडून घ्या. नव्या कांदाची साले गुलाबी रंगाची दिसतात. तर, जुन्या कांद्याची साले सुकलेली असतात. त्यामुळं शक्यतो जुने कांदेच खरेदी करा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)