Kitchen Facts : वाणसामान असो किंवा आणखी काही, एखादी वस्तू त्यातही स्वयंपाकघरातील कोणतीही वस्तू खरेदी करण्याचा मुद्दा येतो तेव्हा एक्स्पायरी डेट अर्थात वापरासाठीची शेवटची तारीख हमखास पाहिली जाते. अमुक दिवस किंला तमुक महिने काही गोष्टी वापरण्याजोग्या असतात. पण, त्यानंतर मात्र आरोग्यासाठी या गोष्टींचा वापर घातक ठरू शकतो. पण, स्वयंपाकघरांमध्ये काही अशाही गोष्टी असतात ज्यांना Expiry Date नसते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कधी लक्षातही आलं नसेल, पण हे खरंय. स्वयंपाकघरात असेही काही पदार्थ, जिन्नस असतात जे कधी खराब होत नाहीत. तुम्हाला माहितीयेत का असे जिन्नस? चला पाहूया त्यांचीच यादी.... 


मध 


मधाला एक्सपायरी डेट नसते. तुम्ही मध कधीही खाऊ शकता. मध जितकं जास्त काळ घरात राहतं, तितकेच त्यातील पोषक घटक वाढतात. त्यामुळं अस्सल मध कधीही खराब होत नाही हे लक्षात घ्या. 


हेसुद्धा वाचा : इथे जो जातो तो क्वचितच परत येतो... दरवर्षी 2000 हून अधिकांचा बळी घेणारं हे भयानक ठिकाण आहे तरी कुठे? 


 


व्हिनेगर आणि लोणचं 


घरात असणारं व्हिनेगर आणि लोणची खराब होत नाहीत हे लक्षात ठेवा. लोणचं जितकं जुनं होतं ते तितकं अधिक मुरतं आणि त्याची चवही वाढते. त्यामुळं चिंतेचा विषयच नाही. 


कुरमुरे 


कुरमुरे किंवा मुरमुरे कधीच खराब होत नसून, त्यांनाही एक्सपायरी डेट नसते. कुरमुरे फक्त हवेच्या संपर्कात आल्यास नरम होतात. पण, ते पुन्हा गरम केल्यास लगेचच कुरकुरीतही होतात. 


तूप 


घरात असणारं तूप वर्षानुवर्षे तसंच राहिलं तरीही ते खराब होत नाही, हो पण ते पुन्हा गरम करून वापरल्यास त्याची चव पुन्हा एकदा Restore झालेली असते. त्यामुळं तुपाला एक्सपायरी डेट असते का, असा विचारही नकोच. 


मीठ 


कोणत्याही पदार्थाला खऱ्या अर्थानं चवदार करणारं मीठही तुम्ही दीर्घकाळासाठी वापरू शकता. मीठाला वापरासाठीची शेवटची तारीख नसते. फक्त ते हवा किंवा पाण्याच्या संपर्कात आल्यास मात्र खराब होण्याची शक्यता असते.