इथे जो जातो तो क्वचितच परत येतो... दरवर्षी 2000 हून अधिकांचा बळी घेणारं हे भयानक ठिकाण आहे तरी कुठे?

Alaska Triangle Mystery: अशाच एका ठिकाणाची माहिती पुन्हा एकदा संपूर्ण जगापुढं कैक प्रश्न उपस्थित करून जात आहे. या ठिकाणाविषयी जाणून घेण्यासाठी इतिहासात डोकावावं लागेल. 

Sep 14, 2024, 11:20 AM IST

Alaska Triangle Mystery: जगाच्या पाठीवर अशी अनेक ठिकाणं आहेत ज्यांच्याविषयी बोलतानाही त्या ठिकाणांची रहस्य मनात धडकी भरवतात. 

1/7

अलास्काच्या

Alaska Triangle Mystery in marathi secreats revealed

16 ऑक्टोबर 1972 चा तो दिवस. या दिवशी एका चार्टड प्लेन अर्थात खासगी विमानानं अलास्काच्या एंकोरेजच्या दिशेनं उड्डाण घेतलं. या विमानात अमेरिकी काँग्रेस नेते थॉमस हेस बोग्स सिनीयर, अलास्का काँग्रेसचे सदस्य निक बेगिच आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह इतर चारजणांचा समावेश होता. 

2/7

प्रवास सुरु होताच...

Alaska Triangle Mystery in marathi secreats revealed

प्रवास सुरु होताच अचानक हे विमान एका टप्प्यानंतर संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेलं. 39 दिवस शोध घेतला असतानाही या विमानाचे अवशेषही सापले नाहीत. त्याच घटनेनंतर जगातील एका रहस्यमयी त्रिकोणाची माहिती समोर आली आणि या ठिकाणाला नाव मिळालं, अलास्का ट्रँगल.   

3/7

अलास्का ट्रँगल

Alaska Triangle Mystery in marathi secreats revealed

अलास्का ट्रँगल हा भाग कोणत्याही प्रशासनाच्या अख्तयारित येत नाही. या क्षेत्रामध्ये उटकियागविक, एंकोरेज आणि जुनो या क्षेत्रांचा समावेश आहे. आतापर्यंत बर्म्यूडा ट्रँगलचीच दहशत संपूर्ण जगात पाहायला मिळाली होती. 

4/7

विचित्र त्रिकोण

Alaska Triangle Mystery in marathi secreats revealed

कारण ठरलं ते म्हणजे इथं येणारी माणसं, विमानं रहस्यमयीरित्या नाहीशी होण्याचं सत्र. अलास्कातील हा विचित्र त्रिकोणही अशाच विचित्र घटनांमुळं उजेडात आला असून, इथं 1970 च्या सुरुवातीपासून 20000 हून अधिक लोक अचानकच, अनपेक्षितरित्या नाहीसे झाले आहेत. 

5/7

उकल

Alaska Triangle Mystery in marathi secreats revealed

काही माहितीपटांतून समोर आलेल्या माहितीनुसार अलास्का ट्रँगलमध्ये अनेक अशा घटना घडल्या आहेत ज्यांची उकल आजपर्यंत होऊ शकलेली नाही. दोन अभ्यासक तर त्यांच्या मोहिमांदरम्यानच दिसेनासे झाले.   

6/7

बेपत्ता

Alaska Triangle Mystery in marathi secreats revealed

1970 च्या दशकात न्यूयॉर्कचा गॅरी फ्रँक हा शिकारीसुद्धा येथील घनदाट जंगलामध्ये बेपत्ता झाला होता. ज्यानंतर 1997 मध्ये पोर्क्यूपिन नदीच्या काठावर एक मानवी कवटी आढळून आली, तपासानंतर ही कवटी त्याच शिकारी इसमाची असल्याचं सांगण्यात आलं. 

7/7

सिद्धांत आणि निरीक्षणं

Alaska Triangle Mystery in marathi secreats revealed

अधिकृत आकडेवारीनुसार अलास्का ट्रँगल भागामध्ये दरवर्षी 2000 हून अधिक नागरिक बेपत्ता होतात. या सर्व प्रकरणांमागे काही सिद्धांत आणि निरीक्षणंही मांडण्यात आली असून, इथं चुंबकीय क्षेत्रापासून एलियन्सचा हस्तक्षेप आणि तत्सम अनेक अनुत्तरित संदर्भही प्रकाशात येतात.