Kitchen Tips News In Marathi: आपल्या रोजच्या आहारातील मीठ महत्त्वाचा पदार्थ आहे. मीठाशिवाय जेवणाला चव येणार नाही. तुम्ही सौम्य किंवा मीठ नसलेले अन्न खाऊ शकत नाही. मीठ फक्त जेवणात नाहीतर वेगवेगळ्या समस्यांवर देखील फायदेशीर ठरू शकतं. असाच एक प्रयोग करुन बघुया तो म्हणजे, तुम्ही कधी गॅसवर मीठ टाकून पाहिले का? जर हा प्रयोग तुम्ही केला नसेल तर नक्कीच करुन बघा. कारण प्रयोग नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण सकाळी उठल्यापासून गॅसवर सतत चहा, नाश्ता, स्वयंपाक वगैरे करत असतो. स्वयंपाक करत असताना गॅसवर काहीतरी गोष्टी सांडतात आणि गॅसची शेगडी खराब होत असते. त्यातच दूध, तेल वगैरे गॅसवर सांडले तर खूप चिकट होऊन जाते. नियमितपणे ही शेगडी साफ केली तर ठिक नाही तर त्यावर घाण साचू लागते. एका गृहिणीने दाखवलेल्या या ट्रिकमध्ये संपूर्ण स्वयंपाक झाल्यावर गॅसवर मीठ टाका आणि कमाल बघा... 


नेमकं काय करायचं? 


तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की,  स्वयंपाकझाल्यावर गॅसच्या शेगडीवर पाणी घाला आणि त्यावर सगळीकडे शॅम्पू टाकून मीठ टाका. 15 मिनिटे असेच ठेवा, तोपर्यंत इतर कामे करा.15 मिनिटांनी स्वच्छ कोरडे कापडाने साफ करा. मीठामुळे शेगडी एकदम चकचकीत दिसेल. आत्तापर्यंत तुम्ही केवळ साबण आणि लिक्विड गॅस साफ केला असेल आता एकदा मीठाने गॅस साफ करुन बघा..