KL Rahul Mother Not Proud Of Him :  वर्ल्ड कप 2023 (ICC Cricket World Cup 2023) मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर 6 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. रोहित शर्माच्या भारतीय संघाचे विराट कोहली आणि केएल राहुल हे दोन विजयाचे शिलेदार ठरले. यानंतर पुन्हा एकदा केएल राहुलची जोरदार चर्चा होत आहे. पण तुम्हाला माहित आहे का? केएल राहुलच्या खेळाने त्याची आई अजिबात खुश नाही. केएल राहुलने स्वतः याबाबत खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौरव कपूरचा लोकप्रिय शो 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' या कार्यक्रमात केएल राहुलने आई आपल्या क्रिकेट क्षेत्रातील यशाने अजिबात खुश नसल्याचं सांगितलं आहे. केएल राहुलकडून त्याच्या आईच्या वेगळ्या अपेक्षा आहे. जगभरातील प्रेक्षकांच केएल राहुल मन जिंकत असला तरीही त्याच्या आईचं मन जिंकण्यासाठी त्याला विशेष मेहनत घ्यावी लागली. 


केएल राहुलच्या आईला का आवडत नाही खेळ 


मुलाखतीत केएल राहुलने सांगितलं की, त्याच्या आईला क्रिकेटपेक्षा त्याने सरकारी नोकरीत काम करावे, असं वाटतं?. पुढे केएल राहुल म्हणाला की, त्याच्या आईने लॉकडाऊनमध्ये डिग्री पूर्ण करायला सांगितली.30 पेपर्स देऊन तू तुझं शिक्षण पूर्ण कर, असा सल्ला केएल राहुलच्या आईने दिला.   


क्रिकेटमधील यशाला शून्य किंमत 


केएल राहुलने क्रिकेटमध्ये कितीही यश संपादन केलं तर आईच्या लेखी याला शून्य किंमत होती. मुलाने शिक्षण पूर्ण करावं, सरकारी नोकरी करावी अशी केएल राहुलची आई राजेश्वरी लोकेशची मनापासून इच्छा होती. केएल राहुलने आपला छंद, पॅशन क्रिकेटमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. भारतीय संघाचा तो माजी उपकर्णधार राहिला आहे. 



ही गोष्ट ठरली महत्त्वाची 


केएल राहुलने शिक्षण पूर्ण करून RBI मध्ये नोकरी मिळवली तेव्हाच त्याची आई खूप खूश झाली.  गेल्या कित्येक वर्षांपासून क्रिकेटमध्ये स्वतःच वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या केएल राहुलच्या क्रिकेट खेळाने त्या कधीच खुश झाल्या नाही. पण RBI ची नोकरी आईच्या चेहऱ्यावर आनंद देऊन गेल्याचं स्वतः केएल राहुल सांगतो. 


पालकांसाठी या गोष्टी ठरतात महत्त्वाच्या 


पालकांसाठी मुलाचं शिक्षणच महत्त्वाचं असतं. शिक्षण तुमच्या सर्वांगिण विकासाला कारणीभूत ठरते. शिक्षण आणि छंद यामध्ये केएल राहुलचे पालक शिक्षणाला अधिक महत्त्व देतात. केएल राहुले दोन्ही पालक प्राध्यापक आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी शिक्षणाला पहिलं प्राधान्य आहे. पालक कायमच मुलांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देतात.