Personality Test: आपल्यं व्यक्तिमत्त्वं नक्की कसं आहे हे तपासण्यासाठी आपण मानसशास्त्रातील प्रयोगांनुसार शास्त्रोद्ध पद्धतीनं तपासण्याचा प्रयत्न करतो. यातून निघालेलं अनुमान तसं असलेच असं नाही. परंतु आपल्याला त्यातून अनेक गोष्टी या कळून येतात. आपलं व्यक्तिमत्त्वं हे दुसऱ्यांपेक्षा फार वेगळं असतं. त्यामुळे आपली चालण्याची पद्धतं, आपली बोलण्याची पद्धतं ही इतरांपेक्षा फार वेगळी असते. आपण विचार वेगळा करतो. आपला स्वभाव हा वेगळा असतो. सोबतच आपली व्यक्त होण्याची पद्धतं, आपण कुठल्या प्रसंगात कसे वागतो, कसे रिएक्ट होतो यावरून आपलं व्यक्तिमत्त्वं हे समजून येते. परंतु तुम्हाला माहितीये का की तुम्ही तुमच्या शरीराच्या या भागावरूनही आपलं व्यक्तिमत्त्वं जाणून घेऊया शकता. तुम्ही तुमच्या ओठांवरून आपलं व्यक्तिमत्त्वं जाणून घेऊय शकता.लक्षात घ्या की हा केवळ एक खेळ आहे. त्याच्यावरून तुमचे व्यक्तिमत्त्वं हे पुर्णत: खरे असेलच असे नाही. तेव्हा चला तर यातून तुमचं व्यक्तिमत्त्वं कसं आहे हे जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही नीट पाहिलंत तर प्रत्येकाच्या ओठांचा आकार हा फारच वेगळा असतो. त्यातून आपल्या ओठांचाही रंग वेगळा असतो. परंतु तुम्ही तुमच्या वेगळ्या ओठांच्या आकारावरून आपलं व्यक्तिमत्त्वं जाणून घेऊ शकता. खालील मुद्यांवरून जाणून घ्या तुमचे व्यक्तिमत्त्वं : 


  • ज्यांचे ओठ हे मोठ्या आणि छोट्या आकाराचे असतात. ती लोकं स्वत:ला इतरांपेक्षा फार पुढे आहेत असं समजतात. परंतु अशी माणसं ही काही स्वार्थी नसतात. 

  • ज्यांचे ओठ हे आकारानं बारीक किंवा पातळ असतात. त्यांना एकटेपणा फार जास्त आवडत असतो. अशी माणसं कुठलंही कामं हे एकट्यानं करू शकतात. सोबत त्यांना स्वत:वर अशावेळी फार जास्त आत्मविश्वास असतो. 

  • काही लोकांचे ओठ हे मोठे आणि जाड असतात. अशी लोकं ही दुसऱ्यांच्या दु:खाला आपलं दु:ख समजतात. त्याशिवाय नि:स्वार्थ भावनेनं इतरांची मदतही करतात. 

  • ज्यांचे वरचे ओठ हे खालच्या ओठापेक्षा मोठे आणि जाड असतात अशी माणसं ही फार कठोर असतात. ही लोकं जास्त आनंदाच्या मागे धावत नाहीत. 

  • मध्यम आकाराचे ओठ असणाऱ्या लोकांचे व्यक्तिमत्त्वंही वेगळे असते. ही माणसं फारच संतुलित जीवन जगताना दिसतात. त्याचसोबत दुसऱ्यांचे दु:ख समजून घेण्यासाठीही कायमच तत्पर असतात. 

  • ज्यांचे वरचे ओठ हे बारीक आणि पातळ असतात अशी माणसं ही खूप उत्साही आणि एनर्जी असणारी असतात. ही लोकं आयुष्यात फक्त मौजमज्जा करताना दिसतात.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)