Trending News : एका खासगी संस्थेने जगातील शंभर वाईट खाद्यपदार्थांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात अनेक देशांच्या खाद्य पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतात जवळपास सर्वच राज्यात खाल्ल्या जाणाऱ्या भाजीचा यात समावेश करण्यात आला आहे. पण वाईट खाद्यपदार्थांच्या यादीत या भाजीचं नाव पाहून भारतीयांनी हे शक्यच नसल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताची खाद्यसंस्कृती
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतातल्या प्रत्येक राज्यातची स्वत:ची खाद्यसंस्कृती आहे. म्हणूनच भारत खवय्यांचा देश म्हणूनही ओखला जातो. प्रत्येक राज्यातील विविध पदार्थ प्रसिद्ध आहेत. शाकाहारी आणि मांसाहारी असे वेगवेगळे पदार्थ भारतातील विविध राज्यांमध्ये तुम्हाला चाखायला मिळतील. खाद्य पदार्थांचा विचार केला तर वेगवेगळ्या पदार्थांची न संपणारी यादीच आहे. पण एक खाद्यपदार्थ मात्र जवळपास सर्वच ठिकाणी बनवला जातो. भारतात वांगी-बटाट्याची भाजी जवळपास प्रत्येक आहारात पाहिला मिळते. विशेषता: उत्तर भारतात ढाबे, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये वांगी-बटाट्याची भाजी मिळते.


वाईट खाद्यपदार्थांची यादी
अलीकडेच TasteAtlas या पारंपरिक खाद्यपदार्थांना रेट करणाऱ्या वेबसाइटने एक यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत जगातील 100 सर्वात वाईट पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत वांगी-बटाटाच्या भाजीला 60वं स्थान देण्यात आलं आहे. बटाटा-वांग्याच्या भाजीला 5 पैकी 2.7 रेटिंग देण्यात आलं आहे. ही यादी जाहीर झाल्यापासून विविध सोशल मीडियावरून लोक त्यावर आश्चर्य व्यक्त करत आहेत.


TasteAtlas ने जाहीर केलेल्या या यादीत वांगं-बटाट्याची भाजी 60 व्या स्थानावर आहे.  उत्तर भारताबरोबर महाराष्ट्रातही ही भाजी आवडीने खाली जाते. वांगं-बटाट्याची भाजी बनवण्यासाठी  कांदा, टोमॅटो आणि विविध मसाल्यांचा वापर केला जातो. TasteAtlas ने या डिशला 5 पैकी 2.7 रेटिंग दिलं आहे. पण सोशल मीडियावर भारतीयांनी ही यादी पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. 


फूड ब्लॉगर प्रभज्योत सिंग याने ही यादी बनवणाऱ्या सदस्यांनी भारतात येऊन भारतीयांची मतं जाणून घ्यायला हवी होती असं म्हटलं आहे. या सदस्यांनी एकदा वांगं-बटाटाच्या भाजीची चव चाखून पाहिला हवी होती असंही त्याने म्हटलंय. खऱंतर वांगं हा भाजांचा राजा मानला जातो. 


TasteAtlas नुसार जगातील 10 सर्वात वाईट पदार्थ


खाद्यपदार्थ - देश - रेटिंग


हकराल- आइसलँड- 1.8


रेमेन बर्गर- अमेरिका- 1.9


येरुशलमी कुगेल- इस्रायल - 2.0


kalvsylta- स्वीडन- 2.2


स्कॅलंड्रोसिस- लातविया- 2.2


चॅपलेले- चिली- 2.2


कॅल्सक्रोव- स्वीडन- 2.2


Bocadillo de carne de caballo- स्पेन- 2.3


मार्माइट आणि चिप सँडविच-  न्यूझीलंड- 2.3


रयिनिमाक्कारा- फिनलँड-2.3