Best Parenting Tips :  आताची कुटूंब व्यवस्था पूर्णपणे बदलून गेलीय. छोटं कुटूंब असूनही आता पालक दोघेही वर्किंग आहेत. अशावेळी अनेक कुटुंबात मुलांना सांभाळायला मदतनीस असतात. मुलांना सांभाळणाऱ्या आया या काही हिरोपेक्षा कमी नसतात. या व्यक्तींबद्दल कायमच कृतज्ञता व्यक्त करायला हवी. अशीच एक कृती अंकित नावाच्या मुलाची सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंकितला तो 6 महिन्यांचा असल्यापासून आया सरोज सांभाळतात. एवढंच नव्हे तर त्या कुटुंबातील स्वयंपाकाचं काम देखील करतात. अंकितला यांचा खूप लळा आहे. अंकितने आपल्या बक्षिसाच्या रकमेतून सरोज यांना चक्क मोबाईल गिफ्ट केला आहे. अंकितच्या या कृतीचं सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा होते. 


अंकित वीकेंड बॅडमिंटून टूर्नामेंटमध्ये 7 हजार रुपये जिंकला. हे पैसे खर्च न करता त्याने काही तरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्याने मदतनीस सरोज यांना २ हजार रुपयांचे मोबाइल फोन खरेदी केली. सरोज यांनी अंकितचा 6 महिन्यांचा असल्यापासून सांभाळ केला आहे. एवढंच नव्हे तर त्याच पालन-पोषणही त्या करतात. या संपूर्ण प्रकारानंतर अंकितच्या संस्कारांचही कौतुक होतं. 


ही पालकांची जबाबदारी 


आता प्रत्येकाच्याच घरी कुणी ना कुणी मदतनीस असतो. त्यांची कृतज्ञता कुटुंबातील सगळ्याच व्यक्तींना असणे गरजेचे आहे. कारण मदतनीसांनी केलेली मदत ही अत्यंत महत्त्वाची ठरते. आजच्या धावपळीच्या जगात मदतीन आणि त्यांची मदत हे कौतुकास्पद आहे. पालकांनी कायम ही बाब मुलांना समजावू सांगावी. 


कृतज्ञ


हल्ली मुलं एकटी किंवा कुणाकडे दिवसभर राहतात. अशावेळी पालकांनी मुलांना केअर टेकर किंवा वॉचमन यांच्याबद्दलही कृतज्ञ राहायला शिकवणे.  मुलं एकटी घरी असताना या व्यक्तींची खूप मदत होते. पालकांनी कायमच मुलांमध्ये हा विचार रुजवावा. 


मुलांना हे शिकवावं 


आताचे पालक एकल पालकत्वाला प्राधान्य देतात. यामुळे भावंड असा प्रकार राहत नाही. ज्यांच्याबरोबर मुलं काही गोष्टी शेअर करतील. त्यामुळे अनेक मुलांमध्ये वाटून घेण्याची सवय नसते. अशावेळी पालकांनी मुलांना आपल्यासोबत किंवा घरातील इतर मंडळींसोबत वाटून गोष्ट करण्याची सवय लावावी. अनेकदा मुलं पालकांपेक्षा या व्यक्तींसोबतच जास्त वेळ घालवतात. अशावेळी त्यांच्यातील नातंही तितकं घट्ट होणं गरजेचं असतं. पालकांनी कायम मुलांना वॉचमन, गाडी स्वच्छ करणे, कचरा साफ करणारे आणि मदतनीस यांच्याबद्दल कृतज्ञता शिकवणे अधिक गरजेतची असते.