शाळांची वेळ बदलली, मुलांच्या अपुऱ्या झोपेसाठी फक्त हेच जबाबदार का?
Maharashtrac School Timing Change: राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ वाजेनंतर भरवणार, सरकारचा मोठा निर्णय. मात्र मुलांच्या अपुऱ्या झोपेला फक्त शाळेच्या वेळाच जबाबदार आहेत का?
Maharashtrac School Timing Change News in Marathi: राज्यातल्या सर्व पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी. राज्यातल्या चौथीपर्यंतच्या शाळांची वेळ बदलण्यात आली आहे. राज्य सरकारने शाळांची वेळ बदलण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. सर्व माध्यमांच्या चौथीपर्यंतच्या शाळा आता सकाळी 9 वाजता भरणार आहेत. सर्व माध्यमांच्या तसंच सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 वाजल्यानंतर भरवण्याचे परिपत्रक राज्य सरकारने काढलं आहे. राज्यपालांनीही शाळेची वेळ बदलण्याची सूचना केली होती. मुलांची झोप होत नसल्याने शाळांची वेळ बदलण्याची मागणी होत होती.अखेर राज्य सरकारने चौथीपर्यंतच्या शाळांची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला आहे. पण मुलांच्या अपुऱ्या झोपेला फक्त शाळाच जबाबदार आहे का? हा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे.
मुलांसीठी झोप किती महत्त्वाची
Cleveland Clinic च्या रिपोर्टनुसार, मुलांची झोप नेमकी किती तासाची असावी? हा प्रश्न पालकांना पडतो. प्रत्येक वयोमानानुसार, झोपेचे तास बदलत असतात. शालेय जीवनातील मुलांना जवळपास 9 ते 12 तासांची झोप आवश्यक असते. मात्र ते आताच्या धावपळीच्या जीवनात शक्य होत नाही. प्रत्येक वयानुसार किती झोप महत्त्वाची पाहूया. बेबी (4 ते 12 महिने) 12 ते 16 तासांची झोप आवश्यक आहे. तर टॉडलर (12 ते 24 महिने) 11 ते 14 तासांची झोप आवश्यक आहे. तर प्रीस्कूल (3 ते 5 वर्षे) 10 ते 13 तासांची झोप आवश्यक आहे. तसेच किड्स (6 ते 12 वर्षे) 9 ते 12 तासांची झोप आवश्यक आहे. तर टिनएजर (13 ते 18 वर्षे) 8 ते 10 तासांची झोप
मोबाइल फोन
लहान मुलांच्या अपुऱ्या झोपेले स्क्रिन टाईमही जबाबदार आहे. कारण अनेकदा मुलं टिव्ही किंवा मोबाईल पाहत राहतात. या सगळ्यात त्यांच्या नजरेवर तीव्र, गडद रंग पडत असतात आणि स्क्रिनचा प्रकाशही यामुळे झोपेसाठी आवश्यक असलेला मंद प्रकाश किंवा झोपेसाठी असलेले वातावरण निर्माण होत नाही. यामुळे मुलांची झोप लांबते. 'मुलं शांत बसत नाहीत, दिला मोबाईल हातात' अशा पालकांची डोळे उघडण्याची वेळ आलीये! एक्सपर्ट म्हणतात...
पालकही कारणीभूत
पालकही लवकर वेळेत झोपत नाहीत. त्यामुळे मुलांचीही झोप अपुरी होते. शुक्रवारी बाहेर जाणे आऊटिंग करणे यासारख्या गोष्टीही वाढू लागल्या आहेत. अशावेळी पालक म्हणून त्यांचीही जबाबदारी आहे की, लवकर मुलांसोबत झोपावे आणि लवकर उठावे. कारण मुलं आजही पालकांवर अवलंबून आहेत.
दुपारची झोप
मुलं अनेकदा पाळणाघरात किंवा आजी-आजोबांकडे असतात. अशावेळी त्यांना दुपारी झोपायची सवय लावली जाते. यामुळे मुलं दुपारी झोप कव्हर करतात. अशावेळी त्यांना रात्री झोप येणे कठीण होते. तसेच मुलांची मस्ती पालक आल्यावर जास्त सुरू होते. त्यामुळे पालकांचा कमी वेळ मिळाल्यामुळे मुलं रात्री जास्त ऍक्टिव होतात.
आरोग्यावर होणारा परिणाम?
पुरेशी, चांगली, कोणताही अडथळा न येता घेतलेली झोप तुमच्या निरोगी आरोग्यासाठी चांगली असते. आयुर्वेदानुसारही, सुर्यादयासोबत उठावं आणि सूर्यास्त झाला की झोपावं. पण हे आताच्या दिनक्रमात शक्य होत नाही. अशावेळी पालकांनी मुलांसाठी विशेष प्रयत्न करावेत. कारण रात्री साधारण 9 ते 1 वाजेपर्यंतचा काळ हा मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. तसेच हार्मोन्सची ग्रोथ देखील या काळातच वाढ होते. उंची वाढण्यास आणि तब्बेत चांगली होण्यास मदत होते.
डॉक्टर काय सांगतात?
आजकाल पालकांची ही एक सामान्य तक्रार आहे की त्यांच्या मुलांना लवकर उठणे कठीण जाते. हे आपल्याला मूळ प्रश्नाकडे परत आणते जो आपण स्वतःला विचारला पाहिजे: आपण असे वातावरण तयार करत आहोत की ज्यामुळे बाळाला झोप येईल? यासाठी पालकांना लवकर रात्रीचे जेवण, झोपण्याच्या किमान एक तास आधी इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर थांबवणे, दिवे मंद करणे आणि बाळांना झोपण्यासाठी चांगले वातावरण तयार करण्याचा सल्ला देतो. जर आपण पालक या नात्याने झोपेच्या वेळी त्यांच्यासमोर सतत आमच्या ऑफिस कॉल अटेंड करत राहिलो किंवा आम्हाला स्वतःला आमची आवडती वेबसिरीज बंद करणे कठीण वाटले तर मुलाला झोपणे स्वाभाविकपणे कठीण होईल, असे डॉ. शिल्पा बाविस्कर, बालरोगतज्ज्ञ, अंकुरा रुग्णालय पुणे यांनी सांगितले आहे.