Husband Wife Relationship Tips: शिव-पार्वतीच्या नात्यातून समजून घ्या वैवाहिक जीवनाचं कर्तव्य; संसारात नाही होणार कलह
Husband Wife Relationship Tips in Marathi: यावर्षी महाशिवरात्री 8 मार्च रोजी शुक्रवारी साजरी केली जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला होता. या दोघांनी आपल्या नात्यांमधून शिकवल्या 4 गोष्टी. नात्यात सुख-शांती-समाधान नांदण्यासाठी तुम्ही देखील करा याचा स्वीकार.
Husband Wife Relationship Tips from Shiv Parvati : हिंदू कॅलेंडरनुसार, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला दरवर्षी महाशिवरात्री मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. यावर्षी हा सण 8 मार्च 2024 रोजी साजरा केला जाणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. यामुळेच या दिवशी उपवास करून महादेवाची पूजा केली जाते. वैवाहिक जीवनात आनंद मिळावा यासाठी या दिवशी गौरी-शंकराची पूजा केली जाते.
भोलेनाथ आणि माता पार्वतीने त्यांच्या वैवाहिक जीवनात जी सूत्रे अंगीकारली ती जर कोणत्याची दाम्पत्याने आपल्या जीवनातही तंतोतंत पाळले तर त्यांच्या जीवनात शांती राहिल यात शंका नाही. महाशिवरात्रीच्या निमित्ताने माता गौरी आणि भोले भंडारी यांच्या त्या आदर्श गुणांविषयी जाणून घेऊया.
प्रेमाला महत्त्व
माता पार्वती अतिशय सुंदर आणि कोमल अशा राजकुमारी होत्या. तर भोला भंडारी म्हणजे आपले महादेव हे गळ्यात सर्प आणि अंगावर भस्म लावून होते. पण, तरीही माता पार्वतीने भगवान शंकरांना आपला जीवनसाथी म्हणून निवडले होते. यावरुन माता पार्वतीने हेच अधोरेखित केलंय की. दिसणं आणि संपत्ती महत्त्वाची नाही. तर त्या व्यक्तीवरचं प्रेम महत्त्वाचं असल्याचं सांगितलं आहे.
जबाबदारी
वैवाहिक जीवनात कुटुंबाची जबाबदारी घेणे ही दोघांचे कर्तव्य असते. एक व्यक्ती जर कामात खूप व्यस्त असेल तर दुसऱ्याला सगळं सांभाळावं लागतं. यासाठी तुम्ही भगवान शिव आणि माता पार्वती यांच्याकडून धडे घेऊ शकता. ज्याप्रमाणे महादेव त्यांच्या तपश्चर्येत मग्न राहतात आणि पार्वती त्यांच्या अनुपस्थितीत मुलगा, कुटुंब आणि सर्व देवी-देवतांची काळजी घेत असे. तसेच प्रत्येक जोडप्याने एकमेकांसोबत मिळून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत. शिव-पार्वती आपल्या नात्यातून या गोष्टी शिकवतात.
अर्धनारीश्वर
भगवान शिवाला अर्धनारीश्वर असेही म्हणतात. म्हणजे अर्धी स्त्री आणि अर्धी पुरुष. सुखी वैवाहिक जीवनाचा मूळ मंत्र हा आहे की पती-पत्नीचे शरीर जरी वेगवेगळे असले तरी. पण, प्रत्यक्षात ते समान आहेत. पती असो वा पत्नी, प्रत्येकाला समान अधिकार आहेत. आजच्या काळातही प्रत्येक जोडप्याने ही गोष्ट तंतोतंत पाळणे गरजेचे आहे. एखमेकांना समान सन्मान देणे तितकेच महत्त्वाचे आहे.
जीवनात संयम
माता पार्वतीला भगवान शंकर असेच सहज जो़डीदार म्हणून सापडले नाहीत. माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. पार्वती यांनी धीर धरला, त्यामुळेच त्यांना पती म्हणून शिव प्राप्त झाले. खऱ्या वैवाहिक जीवनातही संयम खूप उपयुक्त आहे. अशा रीतीने दाम्पत्य आपल्या जीवनात मोठ्या आव्हानांवरही मात करू शकतो.