Anti Aging tips and diet : वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्यांपासून अगदी शारीरिक व्याधींमुळं होणाऱ्या अडचणी असो, अनेकांनाच अनेक समस्या भेडसावताना दिसतात. पण, सध्या मात्र एका 47 वर्षीय उद्योजकानं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अशा काही भन्नाट Tips दिल्या आहेत ज्यामुळं 'वाढतं वय' ही संकल्पनाच तुमच्या आजुबाजुला फिरकणारही नाही असा दावा केला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा उद्योजक आहे, ब्रायन जॉन्सन. नुकतंच एका पॉडकास्टमध्ये ब्रायननं  reversing ageing आणि अँटी एजिंग डाएट अर्थात वाढत्या वयाचा वेग कमी करण्यासाठी, शारीरिक सुदृढता टिकवून ठेवण्यासाठीच्या काही टीप्स दिल्या. यावेळी त्यानं प्रत्येक व्यक्तीनुसार  anti-ageing diet ही संकल्पना वेगळी असू शकते असं सांगितलं. 


पाच ओळींमध्ये अँटी एजिंग डाएट... 


Anti Aging diet पाच ओळींमध्ये स्पष्ट करण्यासाठी विचारण्यात आलं असता ब्रायननं काही खाद्यपदार्थांचा विशेष उल्लेख केला. ज्यामध्ये डाळी, भाज्या, बेरीज, सुकामेवा आणि एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑईलचा समावेश होता. जास्तीची साखर असणारे पदार्थ, रायासनिक प्रक्रिया करण्यात आलेले पदार्थ, तळलेले पदार्थ आणि ज्या पदार्थांची नावं सहजपणे वाचता येत नाहीत अशा गोष्टींचं सेवन टाळावं असंही ब्रायननं सांगितलं. 


दिवसभरात किती वेळा जेवावं? ब्रायन म्हणतो... 


आपण दिवसभरात सहा तासांच्या कालावधीत खातो, असं ब्रायन म्हणाला. दिवसभरातलं शेवटचा आहार तो सकाळी 11 वाजता घेतो. उर्वरित 18 तास तो Intermediate Fasting करतो. हा कालावधी आणि त्यातील समलोत प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असू शकतो असंच तो म्हणतो. 


ब्रायन जॉन्सनच्या मते, वाढत्या वयाचा वेग मंदावण्यासाठी अर्थात शरीरावर याचा फारसा परिणाम न होऊ देण्यासाठी 'झोप' अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. झोप, व्यायाम आणि आहाराच्या सवयी या क्रमानं ब्रायननं निरोगी जीवनशैलीचा कानमंत्र सर्वांनाच आणि प्रामुख्यानं पुरुषांना दिला. दिवसभरात 30 मिनिटांचा व्यायाम किंवा शारीरिक हालचाली अतिशय महत्त्वाचं असल्याचं तो कायम सांगतो. 



हेसुद्धा वाचा : बाळाच्या जन्मानंतर सामान्य महिलांना होतो तो त्रास धनाढ्य ईशा अंबानीलाही चुकला नाही म्हणाली, 'मुलांच्या जन्मानंतर...'


स्वत:चच उदाहरण देत आपण दिवसभरात 3 लीटर पाणी पितो असं सांगताना त्यानं दुपारी 4 वाजल्य़ानंतर मात्र आपण पाणी पित नसल्याचं सांगितलं. यामुळं झोपमोड होत नाही, असा त्याचा समज. दिवसभरात ब्रायन 120 ग्रॅम प्रोटीनचा आहारात समावेश करतो. त्याची एकंदर जीवनशैली पाहता सध्या सोशल मीडियावर ब्रायनच्याच नावाची प्रचंड चर्चा सुरु असून, त्याच्या फॉलोअर्सचा आकडाही वाढताना दिसत आहे.