Parenting Tips :  विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे आपल्या राजकीय वक्तव्यामुळे कायमच चर्चेत असतात. पण आता चर्चा होतेय ती पालकत्वाच्या विधानामुळे. सत्यजीत तांबे यांना दोन मुले आहेत. मोठी मुलगी आणि लहान मुलगा. या दोघांच संगोपन करत असताना सत्यजित तांबे यांना आलेला अनुभव त्यांनी सांगितला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलांना जन्म देण्यासोबतच त्यांच उत्तम संगोपन करणे ही खूप मोठी जबाबदारी असते. मुलगा आणि मुलगी या दोघांनाही वाढवताना त्यांच्या कलेने घेणे अत्यंत गरजेचे असते. सत्यजित तांबे यांना मुलगी आणि मुलगा या दोघांच्याही संगोपनाचा अनुभव आहे. अशावेळी मुलांना वाढवणे सोपे असते की मुलींना? याबाबत त्यांनी आपले मत मांडले आहे. (फोटो सौजन्य - Satyajeet Tambe Instagram)


सत्यजित तांबे यांचे विधान 


मुलीचा बाप होणे ही खूप चांगली गोष्ट आहे. तर मुलाचा बाप होणं ही खूप अवघड गोष्ट आहे. माझी 9 वर्षांची मुलगी आहे जी माझ्या 18 महिन्यांच्या मुलाला खूप छानपणे सांभाळते. माझा मुलगा तिला आक्का म्हणतो. ती अगदी मोठ्या बहिणीप्रमाणे त्याची काळजी घेते. 



मुलीच्या संगोपनाचा अनुभव 


सत्यजित तांबे म्हणतात की, मुलींमध्ये उपचतच काही नैसर्गिक गुण असतात. मुली अतिशय खंबीर असतात. मुली आलेल्या अनुभवातून, घडणाऱ्या प्रसंगातून अधिक कठोर होत जातात. हा आपला इतिहास देखील सांगतो. मुलींमध्ये लहानपणापासूनच सांभाळून घेण्याचा गुण असतो. सत्यजित तांबे यांची मुलगी लहान भावाला खूप छान सांभाळते. त्यामुळे सत्यजित तांबे म्हणतात की, मुलीला सांभाळणे सोपे आहे. 


मुलाच्या संगोपनाचा अनुभव 


सत्यजित तांबे यांच्या म्हणण्यानुसार, मुलाची खूप काळजी घ्यायला लागते. मुलाची अगदी शेवटपर्यंत चिंता असते. म्हणजे तो करिअर नीट करेल ना, त्याचा व्यवसाय नीट सांभाळेल ना? यासोबतच त्याचा संसार कसा होईल? यासारखी काळजी मुलाचे वडील म्हणून त्यांना वाटते. 


जेव्हा बाप बोलतो... 


अनेकदा आई मनातील भावना व्यक्त करत असते. पण जेव्हा अशा पद्धतीने बाबा बोलतो तेव्हा एक पुरुष किंवा एक वडील म्हणून आपल्या मुलांचा किती विचार करतो, याची जाणीव होते. बाप फक्त घरचे खंबीर व्यक्तीमत्व असे नसून त्यामध्ये देखील एक माया दडलेली आहे. याची जाणीव सत्यजित तांबे यांच्या वक्तव्यावरून होत असते. 


(वाचा - KL Rahul च्या आईला अजिबात आवडत नाही त्याचा खेळ; पालकांसाठी कोणत्या गोष्टी असतात महत्त्वाच्या?)


मुलांची जबाबदारी 


एक मुलं असो वा दोन.. पालकांना कायमच पालकत्वाची जबाबदारी वाटते. मुलांना जन्मदेण्यापेक्षा त्याचे संगोपन उत्तम पद्धतीने होणे अत्यंत गरजेचं असल्याचं अनेक पालकांना वाटत असतं. तसेच संगोपन करताना पालकांना आलेले अनुभव हे वेगवेगळे असू शकतात. सत्यजित तांबे यांना आलेला अनुभव सांगितला आहे.