KL Rahul Mother Not Proud Of Him : वर्ल्ड कप 2023 (ICC Cricket World Cup 2023) मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर 6 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. रोहित शर्माच्या भारतीय संघाचे विराट कोहली आणि केएल राहुल हे दोन विजयाचे शिलेदार ठरले. यानंतर पुन्हा एकदा केएल राहुलची जोरदार चर्चा होत आहे. पण तुम्हाला माहित आहे का? केएल राहुलच्या खेळाने त्याची आई अजिबात खुश नाही. केएल राहुलने स्वतः याबाबत खुलासा केला आहे.
गौरव कपूरचा लोकप्रिय शो 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' या कार्यक्रमात केएल राहुलने आई आपल्या क्रिकेट क्षेत्रातील यशाने अजिबात खुश नसल्याचं सांगितलं आहे. केएल राहुलकडून त्याच्या आईच्या वेगळ्या अपेक्षा आहे. जगभरातील प्रेक्षकांच केएल राहुल मन जिंकत असला तरीही त्याच्या आईचं मन जिंकण्यासाठी त्याला विशेष मेहनत घ्यावी लागली.
मुलाखतीत केएल राहुलने सांगितलं की, त्याच्या आईला क्रिकेटपेक्षा त्याने सरकारी नोकरीत काम करावे, असं वाटतं?. पुढे केएल राहुल म्हणाला की, त्याच्या आईने लॉकडाऊनमध्ये डिग्री पूर्ण करायला सांगितली.30 पेपर्स देऊन तू तुझं शिक्षण पूर्ण कर, असा सल्ला केएल राहुलच्या आईने दिला.
केएल राहुलने क्रिकेटमध्ये कितीही यश संपादन केलं तर आईच्या लेखी याला शून्य किंमत होती. मुलाने शिक्षण पूर्ण करावं, सरकारी नोकरी करावी अशी केएल राहुलची आई राजेश्वरी लोकेशची मनापासून इच्छा होती. केएल राहुलने आपला छंद, पॅशन क्रिकेटमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. भारतीय संघाचा तो माजी उपकर्णधार राहिला आहे.
केएल राहुलने शिक्षण पूर्ण करून RBI मध्ये नोकरी मिळवली तेव्हाच त्याची आई खूप खूश झाली. गेल्या कित्येक वर्षांपासून क्रिकेटमध्ये स्वतःच वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या केएल राहुलच्या क्रिकेट खेळाने त्या कधीच खुश झाल्या नाही. पण RBI ची नोकरी आईच्या चेहऱ्यावर आनंद देऊन गेल्याचं स्वतः केएल राहुल सांगतो.
पालकांसाठी मुलाचं शिक्षणच महत्त्वाचं असतं. शिक्षण तुमच्या सर्वांगिण विकासाला कारणीभूत ठरते. शिक्षण आणि छंद यामध्ये केएल राहुलचे पालक शिक्षणाला अधिक महत्त्व देतात. केएल राहुले दोन्ही पालक प्राध्यापक आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी शिक्षणाला पहिलं प्राधान्य आहे. पालक कायमच मुलांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देतात.
दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे.
...Read More|
SL
(20 ov) 163/6
|
VS |
IRE
143(19.5 ov)
|
| Sri Lanka beat Ireland by 20 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
(20 ov) 184/7
|
VS |
NEP
180/6(20 ov)
|
| England beat Nepal by 4 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AFG
(20 ov) 182/6
|
VS |
NZ
183/5(17.5 ov)
|
| New Zealand beat Afghanistan by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.