Boy Names Inspired By Lord Ram : प्रत्येक व्यक्तीची ओळख ही त्याच्या नावावरुन होत असते. नाव आयुष्यभर त्या व्यक्तीसोबत राहतं. अशावेळी बाळांना नावे देताना खास गोष्टींचा विचार करायला हवा. धार्मिक श्रद्धा असेल किंवा तुम्ही प्रभू रामाचे भक्त असाल तर त्यांच्या नावावरून ठेवा मुलाचे नाव. आज आपण अशीच नावांची यादी पाहणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अविराज: 'अविराज' हे भगवान रामाच्या अनेक नावांपैकी एक आहे. तुम्ही मुलासाठी हे नाव नक्कीच निवडू शकता. चार अक्षरी असले तरीही आजच्या आधुनिक दृष्टिकोनातील हे अतिशय अनोखं नाव आहे. अविराज म्हणजे सूर्याप्रमाणे चमकणारा.


मानविक: हे भगवान रामाचे एक नाव आहे. तुमचा मुलगा हुशार,दयाळू आणि देवावर विश्वास ठेवणारा अशा स्वभावाचा असेल तर तुम्ही तुमच्या मुलाचे नाव 'मानविक' ठेवू शकता.


विराज: 'विराज' हे तीन अक्षरी ट्रेंडी नाव आहे. हे प्रभू रामाच्या अनेक नावांपैकी एक आहे, भगवान राम हे सूर्यवंशी होते, म्हणून त्यांना सूर्याचा राजा देखील म्हटले जाते आणि या नावाचा अर्थही तोच आहे. 


शाश्वत: सनातन धर्माचे दुसरे नाव 'शाश्वत' आहे आणि हे राजारामाचेही नाव आहे. हे नाव जेवढे अद्वितीय आहे तेवढेच त्यात वेगळेपण आहे. म्हणून आपण आपल्या मुलाचे असे नाव ठेवू शकता. ट्रेंड बघता या नावाचा विचार करायला काहीच हरकत नाही. 


अद्वैत: 'अद्वैत' हे भगवान रामाचे नाव आहे. तुम्ही तुमच्या मुलाचे हे नाव ठेवू शकता. या नावाचा अर्थ अविश्वसनीय आहे किंवा त्याच्यासारखा कोणीही नाही.


अथर्व: चार वेदांपैकी एक 'अथर्व' आहे आणि ते भगवान रामाचे नाव देखील आहे. या नावाचा अर्थ वेदांचा जाणता असा आहे. 


ब्रम्हज्ञ :  'ब्रम्हज्ञ' या नावाचा अर्थ ‘देवांचा देव’, ज्याला सर्व ज्ञान प्राप्त आहे असा. रामचंद्र हा भगवान विष्णूचा अवतार समजण्यात येतात. त्यामुळे त्यांना सर्वज्ञान प्राप्त होते असंही म्हटलं जातं. 


धन्विन : 'धन्विन' अर्थात सूर्याच्या किरणांपासून जन्मलेला असा याचा अर्थ होतो. सूर्यासारखा तेजस्वी पुत्र, धैर्यवान आणि कणखर पुत्र म्हणजे धन्विन. हा शब्द संस्कृत शब्दावरून घेण्यात आला आहे. भारतीय राजांमध्येही हे नाव दिसून आले आहे. रामचंद्राचे हे नाव तुम्ही मुलासाठी निवडू शकता. पण हे नाव देखील खास आहे.


वेदात्म : 'वेदाचा सर्वस्वी आत्मा म्हणजे वेदात्म'. प्रभूचा आत्मा वेदात नसेल तर त्याला काहीच अर्थ राहणार नाही असा वेदात्म या नावाचा अर्थ आहे. रामचंद्राच्या नामावलीतील हे नाव वेगळे असून तुम्ही त्याचा वापर करून शकता.


जैत्राय : तुमच्या मुलाचे आद्याक्षर 'ज' आले असेल आणि तुम्ही रामचंद्राचे भक्त असून वेगळ्या नावाचा विचार करत असाल तर या नावाची निवड करा. विजय मिळवणारा असा 'जैत्राय'. अतिशय युनिक असं हे नाव आहे. वरील सर्व नावांचा विचार नक्की करा.