चिमुकल्या मुलींसमोर आईनं मेकअप करावा का, कोणती काळजी घ्यावी?
Parenting Tips for Mother : आताच पालकत्व हे विशेष आहे. पालकांना खूप अलर्ट राहावं लागतं. तेथे मुलगा-मुलगी असा भेद नसतो. अशावेळी आईने विशेष काय काळजी घ्यायला हवी.
मुलं पालकांचं अनुकरण करत असतात, हा आपल्यापैकी अनेक पालकांचा अनुभव आहे. अशावेळी पालकांनाच खूप सतर्क राहावं लागतं. मग ते वागताना असो किंवा बोलताना. मुली खास करुन आईचं अनुकरण करत असतात. आई कपडे कसे घालते? जिममध्ये जाताना तिचा पेहराव कसा असतो? मेकअप करताना कोणत्या गोष्टींचा समावेश असतो.
अशावेळी अनेक मातांसमोर प्रश्न पडतो की, आपण मुलींसमोर मेकअप करावा का? जिमला जाताना काय सांगावे? कारण अनेक मुली आईच्या नकळत साडी नेसतात? किंवा त्यांचा मेकअप किट वापरतात? लहान वयात मुलींना मेकअप किटची ओळख होते. हे घातक आहे का? असा प्रश्न अनेक मातांना पडतो. अशावेळी आईने आणि बाबाने देखील मुलींसोबत याबाबत संवाद साधावा. या सगळ्या गोष्टी करण्यामागचं कारण काय?
आई मेकअप का करते?
आता बहुतांश माता या वर्किंग आहेत. सकाळी घरातलं आवरुन आई ऑफिसला निघताना तयार होते. यामध्ये मेकअप किंवा स्पेसिफिक लिपस्टिकचा समावेश असतो. अशावेळी मुलींना फक्त आई मेकअप करते असं वाटतं आणि त्या आईला कॉपी करतात. यावेळी आई आणि वडिलांची भूमिका महत्त्वाची ठरते. आपण मेकअप का करतो? यामागचं मुख्य कारण मुलीला सांगाव. मेकअप हे सुंदर दिसण्यासाठी नसतो. तर ऑफिसला जाताना आपण प्रेझेंटेबल असणे म्हणजे सादरीकरण हे योग्य असणं गरजेचं असतं. ही गोष्ट मुलींना सांगावी.
आईने काय करावं?
मुलीसमोर मेकअप करत असताना उगाच भडक रंगाचा मेकअप करणं टाळावं. घरी असताना किंवा अगदी घरगुती कामांसाठी बाहेर पडत असताना मेकअप किंवा लिपस्टिक लावू नये. यावरुन मुलींना अंदाज येतो की, दररोज मेकअप करणं गरजेचं नाही.
आईने जिममध्ये जाताना?
आईने मुलीसमोर उगाचच मी डाएटवर आहे. माझं डाएट सुरु आहे. मला बारिक व्हायचंय म्हणून मी हे खाते. यासारख्या शब्दप्रयोगांचा वापर टाळावा. कारण मुलींच्या डोक्यात असा विचार पक्का होऊ शकतो की, बारिक असणं गरजेचं आहे. आणि यासाठी डाएट महत्त्वाचा, उपाशी राहणं महत्त्वाचं आहे. व्यायाम हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असावा. आपण सुदृढ आणि निरोगी राहणं गरजेचं असल्याचं पालकांनी मुलांना सांगाव.
यावर उपाय काय?
जिमसोबतच आईने मुलींसोबत योग किंवा इतर व्यायाम घरी करावा. यामध्ये मुलीला देखील सहभागी करून घ्या. कारण व्यायाम हा आपल्या दिनक्रमाचा भाग असल्याचं मुलीला सांगा. एवढंच नव्हे तर पालकांनी घरात एकत्र व्यायाम करावा. हेल्दी राहण्यासाठी डाएट असं नाही पण हेल्दी पदार्थांचा समावेश आहारात करावा.