समाजात अनेकदा मुलींना मागे खेचलं जातं. मुला-मुलींची मेहनत कायमच तराजूमध्ये तोलली जाते. असं का होतं? असा सवाल मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरीने विचारला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुली दिवसेंदिवस प्रगती पथावर जात आहेत. मुलीचं समाजात स्वतःच वेगळं असं स्थान निर्माण करत असताना समाजातून त्यांना मिळणारी वागणूक अतिशय चुकीची आहे. यावर भाष्य करणारा एक अनुभव जया किशोरी यांनी शेअर केला आहे. 


अनेकदा गाडी चालवताना जर ड्रायव्हरने गाडी चुकीची चालवली तर, 'ही नक्कीच मुलगी असेल' असा अंदाज बांधून त्यावर प्रतिक्रिया दिली जाते. तसेच जया किशोरीने एका मुलाखतीत सांगितलेल्या या ना अनेक किस्स्यांवरुन मुलींना समाजाकडून मिळणारी वागणूक अतिशय चुकीची आहे. प्रगती करणाऱ्या मुलीच्या आड आपला समाज आणि त्यांचे विचार येतात. 


जया किशोरीने सांगितला किस्सा


मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरी यांनी मुलाखतीदरम्यानचा एक प्रसंग शेअर करताना सांगितले की, 'मी फ्लाइटने जात होते, तेवढ्यात मागच्या सीटवरून आवाज आला, लोक बोलत होते की, ट्रूबलेंसचा त्रास होत आहे, बहुदा मुलगी पायलट असावी' असं उत्तर मागून देण्यात आलं. 


पुरुषांऐवढीच मेहनत 


जया किशोरीने पुढे म्हटलं की, मुली काही मुलांपेक्षा कमी अभ्यास करतात. त्या काय पैसे देवून पायलट बनली आहे. मुलीनेही तेवढीच मेहनत केली जेवढी पुरुषांनी केली. आपल्या समाजात कायमच महिलांनी केलेल्या कृतीचं कधीच कौतुक होत नाही पण पुरुषांनी केलेल्या कृतीचं भरभरून कौतुक होतं. मुलींच्या मेहनतीकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. 


जया किशोरी काय म्हणाल्या?



मुलींना या प्रसंगातून जावं लागतं


लोकांच्या या विचारसरणीमुळे मुलींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, असेही जया किशोरी यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले. असे म्हणणारे लोक त्यांची प्रेरणा आणि जिद्द कमकुवत करतात. अनेकदा महिलांना या कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. महिलांनी कायमच महिलांचा सन्मान करायला शिकला पाहिजे. तसेच महिलांनी आपल्या मुलांना देखील मुलींचा सन्मान करायला शिकवणे आवश्यक आहे.