दिग्दर्शक नागराज मंजुळे 'सैराट', 'फॅन्ड्री', 'नाळ' आणि 'फँड्री' यांसारख्या सिनेमांमुळे चर्चेत राहिला आहे. नागराजने सिनेसृष्टीला वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे दिले आहे. अगदी त्याच्या हटके स्टाईलने मराठी सिनेमांचा चेहरा-मोहराच बदलून गेला आहे. नागराजचा 'नाळ 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या दरम्यान त्याने आपल्या जीवनातील आणि टीममधील महत्त्वाची व्यक्ती पत्नी गार्गी कुलकर्णी हिच्याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.  


काय म्हणाला नागराज? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गार्गी माझा आरसा आहे. मी माझी कोणतीही कलाकृती पहिली तीन  लोकांना दाखवतो. त्यामध्ये गार्गी येते. दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या सगळ्या सिनेमांमध्ये गार्गीची महत्त्वाची भूमिका असते. खासगी जीवनात गार्गीचं महत्त्व अधिक असल्याचं नागराज सांगतो. 


कुठे झाली भेट 


'आम्ही अहमदनगरला भेटलो. गार्गीला वाचनाची आवड आहे. ती स्वत: कविता लिहिते. मी जेव्हा पटकथा लिहितो, तेव्हा मी ती कथा दोन-तीन व्याक्तींना ऐकवतो. त्यांच्या होकार, नकारामुळे किंवा कथेबद्दल त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेने मला कॉन्फिडन्स येतो. त्यामधील एक व्यक्ती गार्गी आहे, मी गार्गीला सगळ्या पटकथा ऐकवतो. गार्गीची सहित्याची समज चांगली आहे. गार्गी कविता खूप चांगली लिहिते. तिनं मोजकं लिहिलंय पण खूप चांगलं लिहिते. मी ज्या काही क्रिएटिव्ह गोष्टी करतो, त्यामध्ये गार्गीचा महत्वाचा वाटा असतो. ती माझा आरसा आहे.'


या तीन व्यक्ती महत्त्वाच्या 


कुतूब, गार्गी, प्रियांका ही माझी नेहमीची टीम आहे. कुतूब एडिटिंग करतो. माझ्या डोक्यात जेव्हा एखादा चित्रपट करायचं चालू असतं तेव्हा गार्गी कुतूबचं म्हणणं असतं की तू हे कर, ते नको करू. बऱ्याचदा ते डोळे झाकून विश्वास ठेवावं असं असतं. गार्गी प्रोड्युसर असते त्यामुळे माझे व्यवहार तिच सांभाळते. पण मी जे क्रिएटीव्ह करतो त्यात तिचा खूप महत्त्वाचा वाटा असतो. ती माझा आरसा आहे, असं म्हणायला हरकत नाही.” 


पत्नी-पत्नीच्या नात्यातील गोडवा 


नागराज आणि गार्गी हे दोघं खूप छान नातं शेअर करतात. एकाच क्षेत्रात असूनही हे दोघे एकमेकांना खूप छान कॉम्प्लिमेंट करतो. नागराज गार्गीचं भरभरून कौतुक करताना दिसतो. नवऱ्याने बायकोचं कौतुक कसं करावे हे नागराजकडून शिकण्यासारखं आहे. नात्यात गोडवा कायम ठेवायचा असेल तर ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. 



नागराजचं खासगी जीवन चर्चेत 


नागराज फार क्वचितच आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसतो. पण 'नाळ 2' या सिनेमाच्या निमित्ताने नागराज पत्नी आणि मुलं यांच्याबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसत आहे. या दोघांना दोन मुले आहेत. यांची नावे नागराज आणि गार्गीने अतिशय गोड ठेवली आहेत.