Home Decor Tips : मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही आपली वेगळी छटा उमटवणारे नाना पाटेकर कायमच चर्चेत असतात. अभिनय असो वा त्यांच बेधक बोलणे.. हे कायमच प्रभावी असतं. असं सगळं असताना नाना पाटेकरांचा वाडा देखील तितकाच चर्चेत आहे. प्रत्येकाला वाटतं असतं की, धावपळीच्या या दुनियेत एक निवांत क्षण घालवता येईल अशी एक जागा असावी. नाना पाटेकरांचा पुण्यातील वाडा याचं उत्तम उदाहरण आहे. अतिशय शांत आणि निसर्गाच्या कुशीत दडलेलं हे घर ... नाना पाटेकरांनी आपल्याप्रमाणेच या वाड्याचाही साधेपणा जपेल. 


आमराईने सजलाय वाडा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाना पाटेकर यांचा वाडा अगदी आमराईने सजला आहे. मोकळी जागा, आंब्याची झाडे आणि झोपाळा असा परफेक्ट मोहोल असलेला हा वाडा आहे. ज्या लोकांना फार्म हाऊस बांधायचं आहे त्यांनी नाना पाटेकरांच्या वाड्यातून अनुभव घ्यायला काहीच हरकत नाही. 


विहिरीने समृद्ध 


वाडा किंवा फार्म हाऊस बांधताना विहिर असेल तर तुमचं घरं हिरवळीने समृद्ध असेल यात शंका नाही. हक्काची विहिर असेल तर वाडा किंवा फार्म हाऊसमध्ये 24 तास पाणी उपलब्ध असतं. मोकळी जागा आणि भरपूर पाणी असल्यामुळे भरपूर झाडे लावता येतात. नाना यांनी आपल्या वाड्याच्या शेजारी छान झाडे लावली आहेत. 



वरंडा आणि एैसपेस जागा 


घराला कायमच मोकळी जागा असेल तर त्याचा लूक वेगळा असतो. फार्म हाऊस किंवा वाडा बांधताना वंरडा आणि एैसपैस जागा निवडा ज्यामुळे फार्म हाऊसला जुन्या पद्धतीच्या घराचा लूक येतो. वरंडा आणि मोकळ्या जागेमुळे घराला शांत, निवांत जागा मिळते. वरंडा हा अनेकांच्या जिव्हाळ्याची जागा.. जिथे प्रत्येकजण अतिशय मोकळा वेळ घालवतो. 


लाकडाचा वापर 


फार्म हाऊस किंवा वाडा बांधताना लाकडाचा वापर अधिक केल्यास त्याला एक रॉयल टच येतो. लाकडाचं इंटिरिअर असेल तर जुनी परंपरा जपल्याचा एक फिल येतो. लाकडाचा वापर आपण स्वयंपाकघरात किंवा दिवाण खान्यातही करू शकतो. एवढंच नव्हे तर लाकडामुळे कायमच रॉयल टच पाहायला मिळतो. 


नानांचा वाडा 


नाना पाटेकरांच्या या फार्महाउसमध्ये 7 खोल्यासोबतच एक मोठा हॉल आहे. यामध्ये नानांच्या आवडीनुसार, सिंपल वुडन फर्नीचर आणि टेराकोटा फ्लोर आहे. नानांनी आपले घर अतिशय सुंदर सजवलं आहे. यासोबतच घराजवळ अनेक प्रकारचे झाडं-झुडपंही लावण्यात आली आहेत. फार्महाउसमध्ये मोठ्या प्रमाणात गायी-म्हशी आहेत.