Navratri Diet Plan : नवरात्रीचे नऊ दिवस आहेत वजन कमी करण्याची चांगली संधी; कसं कराल डाएट; जाणून घ्या...
Navratri Diet Plan : दसरा दिवाळीत सुंदर दिसण्यासाठी वजन कमी करायचं आहे? मग ही संधी सोडू नका. तुम्ही आहारतज्ज्ञ करिश्मा यांनी सांगितलेला डाएट नवरात्राच्या 9 दिवसात भराभर पोटाची चरबी घटेल.
Navratri Special 9 Days Weight Loss Diet Plan : शारदीय नवरात्रोत्सवाला 3 ऑक्टोबर (गुरुवार) पासून सुरुवात होतोय. देशभरात मोठ्या उत्साहात हा सण तब्बल 9 दिवस साजरा करण्यात येतो. नवरात्रीत अनेक जण अगदी कडक उपवास करतात. तर काही जण पहिला आणि शेवटचा दिवस उपवास ठेवतात. तर काही जण फक्त फळांवर, तर काही जण एक वेळ उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करतात. पण तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर नवरात्रीचे 9 दिवस तुम्ही योग्य डाएट फॉलो केल्यास आणि सोबत गरबा खेळल्यास तुमचं वजन झपाट्याने कमी होईल, असं आहारतज्ज्ञ करिश्मा सांगतात. (Navratri Special 9 Days Weight Loss diet plan fasting diet plan by nutritionist trending news)
गरबा, दांडिया खेळे हा एक प्रकारचा शरीराला व्यायाम मिळतो. त्यासोबत योग्य डाएट केल्यास तुमचं वजन कमी होण्यास मदत मिळते. नवरात्रोत्सवात अनेक जण साबुदाणा, वरीचा भात, शेंगाड्याची पुरी, रताळ्याच्या शीरा, शिंगाड्याचा हलवा, शेंगदाणे, मखाने, पनीरचे सेवन करतात.
वजन कमी करण्यासाठी असा ठेवा डाएट!
सकाळी एक वाटी मलई नसलेलं दही खा. याबरोबर तुम्ही शिंगाड्याचा उपमा किंवा राजगिऱ्याची चपाती खाऊ शकता. याशिवाय कमी साखर आणि हाय फायबर्सयुक्त फळांचा आहारात समावेश करा. तुम्ही सफरचंद, पिअर आणि पपई खाऊ शकता.
दुपारच्यावेळी साबुदाण्याची खिचडी, शिंगाड्याची खिचडी खा. संध्याकाळी दही किंवा दूधाबरोबर नट्स, बदाम अखरोट किंवा शेंगदाणे खा. रात्रीच्यावेळी, रताळ्याचा शीरा हा उत्तम पर्याय आहे. यात तुम्ही साखरेऐवजी गुळाच्या पावडरचा वापर करा.
मधल्यावेळेत भूक लागली तर राजगिऱ्याचे लाडू, खारे शेंगदाणे, शेंगदाणा चिक्की, फराळी चिवडा आणि ड्रायफूड खाऊ शकता. संध्याकाळी दूधाबरोबर फळं खा. दोन दिवसातून एकदा किंवा रोज सकाळी नारळपाणी प्या. दुधात काजू-बदाम घालून ते उकळून पिऊ शकता. यामुळे बराचवेळ पोट भरलेलं राहील.
डिटॉक्स वॉटर
दुपारच्या जेवणापूर्वी, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी तुमच्या आहारात एक ग्लास डिटॉक्स ड्रिंकचा समावेश करा. लिंबू पाणी, ताक किंवा नारळ पाणी प्या. याशिवाय ग्रीन टीचाही समावेश करता येईल. या सर्व गोष्टी तुम्हाला फ्रेश वाटण्यास मदत करतील.
कोणताही पदार्थ तेलात तळण्याऐवजी वाफेवर शिजवा.
साखरेऐवजी तुम्ही मध, गूळ, खजूर अशा इतर पर्यायांचा वापर करू शकता.
साबुदाणा, मखाना किंवा अरबी हाय कॅलरीज फूडमुळे वजन वाढू शकतं.
सुक्या मेव्याबरोबर फळांचा आहारात समावेश करा.
जास्तीत जास्त पाणी प्या. पाणी पिण्याचा कंटाळा केला तर डिहायड्रेशन होऊ शकतं.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)