Optical Illusion Personality Test: हल्ली सोशल मीडियावर दर दिवशी काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही फोटो इतके जास्त नजर रोखून धरतात की, पाहणारेही हैराण होतात. व्हायरल होणाऱ्या या फोटोंमधील काही गोष्टी थेट मानसिकतेशी संबंधित असून, असा दावा केला जातो की या गोष्टींमुळे अमुक एका व्यक्तिच्या बौद्धिक पातळीपासून त्या व्यक्तीच्या विचार करण्याच्या क्षमतेपर्यंतही माहिती मिळते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑप्टीकल इल्यूजनचे व्हायरल होणारे फोटो हा त्याचाच एक भाग. युक्रेनीयन कलाकार ओलेग शुपल्याकनं हे चित्र तयार केलं असून,  "द माइंड्स जर्नल"नं हा फोटो शेअर केला. चार वेगवेगळ्या गोष्टी दिसणाऱ्या या फोटोमध्ये तुम्हाला सर्वप्रथम नेमकं काय दिसतं यावरून तुमच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक गुणविशेष अधोरेखित होतात. तुम्हाला या चित्रात सर्वप्रथम काय दिसलं? 


वयोवृद्ध व्यक्तीचा चेहरा दिसल्यास... 


तुम्हाला जर या चित्रात सर्वप्रथम वयोवृद्ध व्यक्तीचा चेहरा दिसल्यास याचा अर्थ असा तुम्ही स्वाभाविकदृष्टया सखोल विचार करणाऱ्या व्यक्तींपैकी एक असून, अतिशय समजुतदार आहात. तुमची निरीक्षणक्षमता तुम्हाला चारचौघात महत्त्वाचं स्थान देऊन जाते. तुम्ही एक अशा व्यक्ती आहात ज्यांना लहानसहान गोष्टींमध्ये लक्ष घालण्यात रस असून, तुम्ही एक बुद्धिजीवी आहात. 


हेसुद्धा वाचा : एका आठवड्यात सात दिवसच का असतात? यामागे आहे एक रंजक कहाणी 


 


छत्री उघडणारी महिला... 


या चित्रात तुम्हाला सर्वप्रथम एक छत्री उघडणारी महिला दिसल्यास याचा अर्थ तुम्ही एक उत्साही व्यक्तीमत्त्वं आहात. सकारात्मक मानसिकता ही तुमची जमेची बाजू आहे. अतिशय कठीण प्रसंगांमध्येही तुम्हाला हीच वृत्ती मदतीची ठरते. तुमचा सकारात्मक दृष्टीकोन आणि उत्साह इतरांसाठीही प्रेरणास्त्रोत ठरतो. 


सर्वप्रथम फूल दिसल्यास... 


तुम्हाला या चित्रात सर्वप्रथम फूल दिसल्यास याचा अर्थ तुम्ही एक संवेदनशील व्यक्ती आहात असा होतो. तुम्ही इतरांशी भावनिक स्तरावर नातं जोडू पाहता. कोणत्या वेळप्रसंगी नेमकं काय होणं अपेक्षित आहे याची तुम्हाला पूर्ण कल्पना आहे. इतरांच्या समस्या समजून घेत त्या अनुषंगानं तुम्ही तोडगा काढण्याच्या हेतूनं काम करता. 


चित्रात तुटलेली छत्री दिसल्यास... 


तुटलेली छत्री पकडलेली महिला तुम्हाला या चित्रात दिसल्यास याचा अर्थ तुमचा स्वभाव थट्टामस्करीचा असून, इतरांशी तुम्ही अगदी सहजपणे जोडले जाता. तुमच्या हसतमुख स्वभावानं तुम्ही कायमच इतरांची मनं जिंकता.