सिटी ऑफ लवमध्ये रोमँटिक प्रपोझ! ऑल्मिपिकमध्ये गोल्ड मेडलसोबतच तिच्या हातात प्रेमाची अंगठी
`प्रेमाचे शहर` म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅरिसमध्ये ऑलिम्पिकदरम्यान एक सुंदर लव्हस्टोरी आणि रोमँटिक प्रपोझ. चीनचा बॅडमिंटनपटू हुआंग याकिओंगने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले. यानंतर चीनचा बॅडमिंटनपटू लियू युचेनने तिला गुडघ्यावर बसवून लग्नासाठी प्रपोज केले.
फ्रान्सच्या पॅरिसला प्रेमाचे शहर म्हटले जाते. जगभरातील अनेक कपल्स येथे आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी येतात. मात्र, सध्या पॅरिसमध्ये ऑलिम्पिक पदकांसाठी खेळाडूंमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. अशावेळी शुक्रवारी बॅडमिंटन कोर्टवर सुंदर प्रेमाचा बहार पाहायला मिळाला. चॅपेल एरिना येथे मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यानंतरच, लियू युचेनने त्याची सुवर्णपदक विजेती मैत्रीण हुआंग याकिओंगला लग्नासाठी खास अनोख्या पद्धतीने प्रपोझ केलं आहे. पॅरिसमध्ये ऑल्मिपिक सामन्यांसोबतच ही लव्हस्टोरी आणि रोमँटिक प्रपोझ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
गोल्ड मेडल मिळाल्यानंतर केलं प्रपोझ
चीनी बॅडमिंटन स्टार हुआंग याकिओंगने पॅरिस ऑलिम्पिकमधून सुवर्णपदक तर पटकावलेच आहे. सोबतच तिला छान प्रपोझ रिंग देखील मिळाली आहे. शनिवारी 30 वर्षीय याकिओंगने झेंग सी वेईसोबत खेळत मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले. हे त्यांचे पहिले ऑलिम्पिक सुवर्ण होते. ला चॅपेल एरिना पूर्णपणे प्रेक्षकांनी भरले होता. याचवेळी प्रपोझ देखील केलं आहे.
भावूक होऊन याकिओंगने म्हणाले की,
मिश्र दुहेरीचा पदक सोहळा आटोपल्यानंतर चीनकडून पुरुष दुहेरीत खेळणाऱ्या लिऊ युचेनने याकिओंगसमोर गुडघे टेकले. त्याने खिशातून लग्नाची अंगठी काढली आणि हुआंगला प्रपोज केले. यानंतर ला चॅपेल एरिनामध्ये उपस्थित प्रेक्षकांनी आनंदाने उड्या मारल्या आणि स्टेडियममध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. या सगळ्या क्षणामुळे तेथील वातावरण अतिशय प्रेमाने भरले आणि भारले होते.
दोघांनी टोकियोमध्ये जिंकले होते रौप्यपदक
पॅरिस ऑलिम्पिकच्या पहिल्याच फेरीत लिऊ युचेन बाहेर पडला होता. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये दुहेरीचे रौप्यपदक जिंकले. हुआंग याकिओंगलाही टोकियोमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये लिऊ आपल्या खेळात चमक दाखवू शकला नाही पण हुआंगने प्रपोझ करुन तेथील वातावरणच बदलून टाकले.
जेव्हा लियू युचेनने गुडघे टेकून लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा हुआंग भावूक झाला. यानंतर हुआंगने 'हो' म्हटले. या आश्चर्यानंतर, हुआंग याकिओंग म्हणाली की तिला पॅरिसमध्ये एंगेजमेंट रिंग मिळण्याची अपेक्षा नव्हती आणि ती म्हणाली की खेळांच्या तयारीवर मी पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे. "मी माझ्या भावना स्पष्ट करू शकत नाही कारण मी आनंदी आहे, आनंदी आहे, मी खूप आनंदी आहे," हुआंग अश्रूंनी म्हणाला.