HSC and SSC Board Exam Study Tips: दहावीच्या बोर्डाची परीक्षा 1 मार्च 2024 पासून सुरु होत आहे. तर बारावीची बोर्डाची परीक्षा सुरु झाली आहे. परीक्षा कोणतीही असो मग ती बोर्डाची किंवा इतर कोणतीही ताण-तणाव हा जाणवतोच. विद्यार्थ्यांसोबतच पालकांसाठीही हा अतिशय महत्त्वाचा काळ असतो. विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या अभ्यासाचे आणि कष्टाचे चीज होते. मात्र परीक्षेच्या दिवसांमधील ताण-तणाव कसा दूर करावा हा प्रश्न अनेकांना पडतो? यावर युथ मेंटॉर प्रल्हाद वामनराव पै यांनी महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत. 


पेपरला गेल्यावर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक विद्यार्थ्यांचा परीक्षागृहात पोहोचल्यावरच ताण-तणाव वाढतो. अशावेळी मन शांत आणि स्थिर करणे अत्यंत गरजेचे आहे. अशावेळी प्रल्हाद पै यांनी नेमकं काय करावं? हे सांगितलं आहे. ताण तणाव दूर करण्यासाठी नकारात्मक विचार बाहेर काढून तेथे सकारात्मक विचार मनात भरणे अत्यंत गरजेचे आहे. अशावेळी सद्गुरु श्री वामनराव पै यांनी सांगितलेली विश्वप्रार्थना म्हणण्याचा सल्ला दिला आहे. 



त्याचबरोबर मनाला सकारात्मक फिडिंग करणे अत्यंत गरजेचे आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी स्वयंसूचना देणे गरजेचे आहे. यामध्ये खालील वाक्यांचा समावेश करावा. 


देवा सर्वांना चांगल यश मिळू दे 
देवा सर्वांना चांगले पेपर जाऊ देत. 
देवा सर्वांचं मन स्थिर आणि शांत होईल. 


पेपर झाल्यावर चर्चा नको


अनेक विद्यार्थ्यांना पेपर लिहून झाल्यावर त्यावर चर्चा करायला आवडते. पण ही सवय अत्यंत चुकीची आहे. तसेच अनेक पालक देखील मुलांना घरी जावून मुलांना पेपर कसा गेला? यासोबतच त्यावर चर्चा करतात. अशावेळी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ही चूक टाळावी. कारण पेपरमध्ये काही चूका झाल्या असल्या तर त्याचा परिणाम पुढच्या पेपरवर होऊ शकतो. त्यामुळे झालेल्या पेपरचा फार विचार न करता येणाऱ्या पेपरवर जास्त फोकस करणे गरजेचे आहे. 


पेपर लिहून झाल्यावर चेक करा 


अनेकदा आपण पेपर लिहून झाल्यावर रिलॅक्स होतो. किंवा पेपर लिहून झाल्यावर त्यावर नजर टाकत नाही. पण ही चूक विद्यार्थ्यांना महागात पडू शकते. कारण अनेकदा आपण पेपर लिहिताना छोट्या छोट्या चूका करतो. या चूका टाळण्यासाठी एकदा पेपर लिहून झाल्यावर नजर टाकावी. आपली एक छोटी चूक विद्यार्थ्यांना महागात पडू शकते. तसेच पेपर नीटनेटका लिहिणे अत्यंत गरजेचे आहे. 


पेपरसाठी टिप्स आणि स्ट्रेटेजी



रिझल्टचा विचार करु नका


अनेकदा विद्यार्थी परीक्षेदरम्यान किंवा पेपर लिहितानाच रिझल्टचा, मार्कांचा विचार करतात. पण हे करणे चुकीचे आहे. अभ्यास सुरुवातीपासून केला असेल तर ताण फार येत नाही. त्यामुळे रिझल्टबाबत नकारात्मक विचार फार डोक्यात येत नाही.