वडोदराच्या महाराणी राधिकाराजे गायकवाड यांनी राजघराणातील लग्न, लग्न जमवण्याची पद्धत यावर भाष्य केलं आहे. राजघराण्यातील राजकुमार किंवा राजकुमारी सामान्य कुटुंबातील मुलांशी लग्न करतात का? या प्रश्नावर आपली मत मांडल आहे. राधिकाराजे गायकवाड यांनी नुकताच रणवीर इलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये उपस्थिती दर्शवली होती. ज्यामध्ये त्यांनी राजघराण्यातील लग्न आणि त्याबाबतच्या कल्पनांबद्दल सांगितलं आहे. 


अरेंज मॅरेजला का महत्त्व? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राधिकाराजे गायकवाड यांनी यावर उत्तर देताना सांगितलं की, मला असं वाटतं की, अरेंज मॅरेजला महत्त्व दिलं जातं. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींना असे वाटते की, आपलं मुलं ज्या कुटुंबात वाढलं ते त्याच पद्धतीच्या घरी लग्न करुन जावे, अशी त्यांची इच्छा असते. खास करुन अरेंज मॅरेजमध्ये असा विचार केला जातो. 


महाराणी राधिकाराजे गायकवाड यांचा व्हिडीओ



सर्वसामान्य लोकांशी लग्न करतात का 


महाराणी राधिकाराजे गायकवाड यांनी सांगितले की, आता सर्वसामान्य किंवा बाहेरच्या व्यक्तीशी लग्न करणं अतिशय सामान्य आहे. नॉन रॉयल लोकांना देखील आता रॉयस कुटुंबियांनी स्वीकारलं आहे. 


लग्नात अडचणी का येतात? 


महाराणी राधिकाराजे गायकवाड यांनी सांगितलं की, सर्वसामान्य लोकांशी लग्न केल्यानंतर यामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. याबाबत त्या सांगतात की, खरं सांगायला झालं की, हे कठिण आहे. आम्ही राजघराण्यातील मुलं राजेशाही थाटात पॅलेसमध्ये वाढलो आहे. येथे आम्हाला मिळणारा मान, सन्मान अतिशय महत्त्वाचा आहे. याची आम्हाला सवय होते. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीशी लग्न केल्यानंतर या गोष्टी नसतात. म्हणून त्रास होतो. 


ओळख गमावून बसतो


पुढे त्या म्हणाल्या की, काही वेळा या सर्व गोष्टींनी काही फरक पडत नाही पण नंतर या गोष्टींमुळे समस्या निर्माण होतात. राधिकाराजे म्हणाला की, जसे तुम्ही लग्न केले आणि तुम्ही आनंदी आहात कारण तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करता आणि तुम्हाला स्टेटसची पर्वा नाही पण कधी कधी या परंपरा आपल्यात इतक्या खोलवर रुजलेल्या असतात की आपण भरकटतो आणि आपल्याला असे वाटते की, आपण आपली ओळख गमावून बसतो. "