Rahul-Disha Daughter First Pic : दिशा परमार आणि राहुल वैद्य गेल्या वर्षी 20 सप्टेंबर रोजी एका मुलीचे पालक झाले आणि आता त्यांनी पहिल्यांदाच चाहत्यांना त्यांच्या प्रियाचा चेहरा दाखवला आहे. 'बडे अच्छे लगते हैं 3' अभिनेत्री दिशा परमार आणि 'बिग बॉस 14' मध्ये दिसलेली राहुल वैद्य आजकाल त्यांच्या मुलीबद्दल खूप आनंदी आहेत. राहुल आणि दिशा एअरपोर्टवर दिसले, तिथे दोघांनी कॅमेऱ्याकडे बघून सगळ्यांना आपल्या मुलीचा पहिल्यांदाच चेहरा दाखवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिशा आणि राहुल व्हॅलेंटाईन डेला सुट्टी घालवण्यासाठी परदेशात निघाले. हे दोघेही त्यांच्या मुलीसोबत विमानतळावर उपस्थित असलेल्या पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पापाराझींनी व्हिडिओ शेअर करून विचारले आहे की, मुलगी राहुलसारखी दिसते की आई दिशाकडे? यावर यूझर्सच्या प्रतिक्रिया वडिल राहुलच्या बाजूने आहेत.


चाहते म्हणतात, बाबाची एकदम कॉपी 



ETimes शी बोलताना राहुल म्हणाला होता, 'मी क्लाउड नाइनवर आहे, ही खूप आश्चर्यकारक भावना आहे. माझे पहिले मूल मुलगी व्हावे असे मला नेहमीच वाटत होते. माझ्या फिलिंगचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, असे तो म्हणाला होता.


बिग बॉसमध्ये पत्नीला केलं प्रपोझ 



 रिॲलिटी शो 'बिग बॉस 14' मध्ये राहुल वैद्यने त्याची गर्लफ्रेंड दिशा परमारला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्याचवेळी त्याने लग्नाचा प्रस्तावही ठेवला होता. शोदरम्यान दिशानेही प्रतिक्रिया दिली आणि तिनेही राहुलचा प्रस्ताव स्वीकारला. यानंतर राहुल-दिशाने लग्न केलं आणि त्यानंतर त्यांना एक गोंडस मुलगी झाली. 


दिशा-राहुलच्या लेकीचं नाव आणि अर्थ 


राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या मुलीचं नाव 'नव्या' असं आहे. नव्या या नावाचा अर्थ देखील अतिशय खास आहे. या नावाचा अर्थ ज्याच्यावर लक्ष्मीचा कृपाशिर्वाद आहे. राहुल आणि दिशाने बाळाचं नाव अगोदर ठरवलं नव्हतं पण लक्ष्मीचं घरात आगमन झाल्यानंतर.