लग्नाआधी एक-दोन ब्रेकअप झालीच पाहिजेत; माजी IAS अधिकाऱ्याने दिला मोलाचा सल्ला
Relationship Tips In Marathi: लग्न हा आयुष्यातील सर्वात मोठा टप्पा असतो. लग्नानंतर जोडीदारासोबत नाते टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टी गरजेच्या ठरतात.
Relationship Tips In Marathi: ब्रेकअप ही गोष्टच खूप त्रासदायक व दुखःद असते. ज्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम करतो ती अचानक आयुष्यातून निघून जाते हे समजून घेणेच खूप कठिण असते. ब्रेकअप झाल्यानंतर त्या व्यक्तीला समाजात आजूबाजूला काय सुरूये हे देखील कळत नसते. अनेकद हृदय तुटण्याच्या वेदना इतक्या गंभीर असतात की त्या अनुभवातून ती व्यक्ती पूर्णतः बदलून जाते. IAS अधिकाऱ्याची नोकरी सोडून यूपीएससीचे कोचिंग क्लास घेणाऱ्या डॉ. विकास दिव्यकीर्ति यांनी आयुष्यात एक-दोन ब्रेकअपचा अनुभव घ्याच, असं म्हटलं आहे. यामागचा नक्की उद्देश काय, हे जाणून घेऊया.
दृष्टी IAS कोचिंगमध्ये यूपीएससीच्या अभ्यासक्रमाबरोबरच आयुष्याचे धडे देणारे डॉ विकास दिव्यकीर्ती यांनी ब्रेकअपबाबत एक महत्त्वाचं विधान केले आहे. ब्रेकअपनंतर व्यक्तीच्या स्वभावात येणारा बदल खूप गरजेचा असतो. म्हणून माझं असं म्हणणं आहे की, लग्नानंतर एक-दोन ब्रेकअप झालं तर चांगलंच आहे. दिव्यकिर्ती असं का म्हणताय? जाणून घेऊया.
विकास दिव्यकिर्ती यांनी आयएएस पदाचा राजीनामा देऊन कोचिंग सेंटर सुरू केले. दिव्यकिर्ती यांच्या म्हणण्यानुसार, ब्रेकअपही मॅच्युरिटीची सगळ्यात पहिली पायरी असते. प्रेयसी किंवा प्रियकरासोबत नाते तुटल्यानंतर भावनिकरित्या व्यक्ती अधिक कणखर बनतो.
लग्नासाठी ब्रेकअप गरजेचे
दिव्यकिर्ती यांच्या म्हणण्यानुसार, लग्न नेहमी मॅच्युअर (परिपक्व) असलेल्या व्यक्तीसोबतच करावं. एखाद्या व्यक्तीसोबत जेव्हा तुम्ही आयुष्यभराची गाठ बांधता त्याच्याआधी ब्रेकअपच्या दुखाला सामोरे गेलेले असता. त्यामुळं तुमच्यामध्ये लग्न टिकवण्यासाठी करावी लागणारी तडजोड आणि समज येते. तुम्हाला माहिती असते की तुमच्या जोडीदारासाठी काय केले म्हणजे तुमचं नात अधिक मजबूत होईल.
दिव्यकिर्ती यांनी ब्रेकअप लग्नासाठी गरजेचे आहे याचा अर्थ असा नाही की जाणूनबुजून ब्रेकअप करावे, असंही दिव्यकिर्ती यांनी स्पष्ट केले आहे. जर, रिलेशनशिपमध्ये असतानाच तुम्हाला असा जोडीदार मिळेल ज्याच्यासोबत तुमचे नाते खूप छान फुलले असेल तर, एकमेकांना आयुष्यभराचा जोडीरा बनवण्याचा विचार करा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)