देशभक्तीच्या रंगात रंगण्यासाठी तयार राहा. 26 जानेवारी आपला 75 वा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत. प्रजासत्ताक दिन म्हणजे भव्य परेड, देशभक्तीपर कार्यक्रम आणि दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवतानाचा अभिमान. तसेच देशाबद्दलचे प्रेम व्यक्त करण्याचा आणि संविधानात समाविष्ट केलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या मूल्यांचा उत्सव साजरा करण्याचा हा दिवस आहे. या दिवशी आपल्या मुलांमध्येही जागृत करा देशभक्तीपर भावना. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लहान मुलांना त्यांच्या देशाच्या स्वातंत्र्याबद्दल सांगितले पाहिजे. जेणेकरून त्यांना देशप्रेमाची भावना जागृत होईल. मुलांना सांगायलाच हवे की, ते स्वतंत्र भारतात श्वास घेत आहेत. ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती शूर सुपुत्रांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी मुलांनी कोणत्या प्रकारचे पोशाख घालावे, हे जाणून घेऊया. 


राष्ट्रीय नेता आणि स्वातंत्र्यसेनानी


मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना राष्ट्र्रीय नेत्यांची किंवा स्वातंत्र्य सैनिकांची माहिती सांगा आणि तशी वेशभूषा करा. जसे की, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाष चंद्र बोस  आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यासारख्या नेत्यांची वेशभूषा मुलांना करा. तसेच त्यांच्या प्रतीची माहिती दोन ओळी बोलून घ्या. यामुळे त्यांच्यात देशप्रेम निर्माण होईल. 


भारतातील विविधता 


भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. भारतात 28 राज्ये आहेत. ज्यामध्ये वेगवेगळे प्रदेश आणि वेगवेगळ्या जातीचे लोक आहेत. तुम्ही मुलांना वेगवेगळ्या धर्माप्रमाणे तयार करा. ज्यामुळे भारतातील एकता जपता येईल. वेगळ्या धर्माची वेशभूषा आणि त्यांच्या भाषेची दोन वाक्य मुलांकडून पाठ करून घ्या. 


मॅसेज असलेले आऊट फिट 


प्रजासत्ताक दिनानिमित्त योग्य असलेले देशभक्तीपर लोगो आणि संदेश असलेले टी-शर्ट मुले घालू शकतात. मात्र, या प्रकारचा ड्रेस बाजारात क्वचितच मिळतो. परंतु आपण ते डिझाइन देखील करू शकता.


कुर्ता पायजमा - साडी


प्रजासत्ताक दिनानिमित्त कुर्ता पायजमा घालता येतो. कुर्ता-पायजमा हा असा पोशाख आहे जो कोणत्याही सणाला परिधान करता येतो. हे मुलांसाठी आरामदायक आहे. तसेच मुलींसाठी वेगवेगळ्या पद्धतीची साडी नेसवू शकता. ज्यामुळे त्यांना पारंपरिक पोशाखाचा देखील आनंद होईल. 


लोकप्रिय व्यक्तीमत्त्व 


भारताला वेगळा असा इतिहास आहे. अनेक मान्यवर व्यक्तींनी भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. जसे की, एपीजी अब्दुल कलाम, स्पोर्ट्स आयकॉन सचिन तेंडुलकर, रविंद्रनाथ टागोर, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यासांरख्या मान्यवरांचा पोशाख परिधान करायला देऊ शकता.