How to make Roti In Pressure Cooker : भारतीय जेवणाचं ताट हे चपाती किंवा रोटी, पोळीशिवाय अपूर्ण मानलं जातं. डाळ, भाजीसोबत चपाती हवीच. त्यामुळे भारतीय प्रत्येक घरात चपाती सकाळचं स्वयंपाक असो किंवा रात्रीचं चपाती ही बनणारच. महिलांना ही चपाती बनवण्यासाठी बराच वेळ लागतो. असं म्हणतात की आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर...कारण तासंतास उभं राहून घाम गाळत गॅसजवळ चपाती करावी लागते. अनेक महिलांना हे सर्वात बोरिंग काम वाटतं, पण त्यांच्याकडे पर्याय नसतो. खूप क्वचित घरामंध्ये चपाती करण्यासाठी मावशी ठेवली जाते. पण या मावशांदेखील इतके पैसे आकारतात की ही चपाती नको रे बाबा असंच वाटतं. (Roti In Pressure Cooker Makes 20 chapatis in a few minutes video viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण जर काही मिनिटांमध्ये तुम्ही 20 चपाती करु शकता असं आम्ही सांगितलं तर...तुमचा विश्वास बसेल का? पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक महिला कुकरमध्ये चपाती करताना दिसत आहे. या महिलेने कुकरीमध्ये एक नाही दोन नाही जवळपास सात आठ चपात्या एकाच वेळी  बनवल्यात. 


हेसुद्धा वाचा - Cholestrol Level : वयानुसार स्त्री-पुरुषांची कोलेस्ट्रॉल लेव्हल किती असायला हवी?


कुकरमध्ये चपाती कशी बनवायची? (How to make Roti In Presser Cooker)


चपाती किंवा रोटीसाठी सगळ्यात आधी कणिक म्हणजे आटा मऊ मिळून घ्या. आता ते पीठ काही वेळासाठी झाकून ठेवा. 
आता या पिठापासून गोलाकार चपात्या लाटून घ्या. 
आता गॅसवर कूकर ठेवा आणि त्यात एक वाटी एवढं मीठ टाका. आता त्यात चपाती ठेवाता येईल एवढा आकाराचा डबा किंवा वाटी उलटी ठेवा. 



आता तुम्ही बनवलेल्या चपाती एकावर एक ठेवा. त्या एकमेकांना चिकटू नये म्हणून चपातीवर कोरडे पीठ अगदी हलके टाका आणि त्यावर दुसरी चपाती ठेवा. 
आता या सगळ्या 8 ते 10 चपात्या कुकरमध्ये त्या भांड्यावर ठेवा आणि कुकरचं झाकण लावून घ्या. अशा प्रकारे 3 ते 4 मिनिटांमध्ये तुमच्या चपात्या तयार होती. 
आता कुकरमधून चपाती चिमट्याने सावकाश काढा आणि त्यावर तूप किंवा तेल तुम्हाला आवडत असेल तर लावा.