युवा फलंदाज सरफराज खानला अखेर भारताकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात सरफराज प्लेइंग इलेव्हनचा भाग झाला आहे. श्रेयस अय्यरच्या जागी सरफराज खानचा संघात समावेश करण्यात आला आहे. अय्यरच्या जागी केएल राहुल संघात परतला. मात्र पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे तो तिसऱ्या कसोटीतून बाहेर पडला होता. 25 वर्षीय सरफराजने देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 70 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत. सरफराज खान भारतासाठी टेस्ट सामने खेळणारा 311 वा खेळाडू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरफराज खानने पदार्पणाची कॅप अनिल कुंबळे यांच्याकडून स्वीकारली तेव्हा त्याचे वडील नौशाद मैदानावर उपस्थित होते. नौशाद यांच्यासाठी हा अतिशय भावूक क्षण होता. त्यांनी आपल्या मुलाला मिठी मारली. नौशाद खान हे सरफराजचे प्रशिक्षक देखील आहेत. सरफराज त्याच्या कोचिंगमध्ये क्रिकेट शिकला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी वडील आणि प्रशिक्षक म्हणून हा क्षण अतिशय खास आहे. सरफराज खान आणि त्याच्या वडिलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाप-लेकाचं असं भावनिक नातं फार कमी वेळा पाहायला मिळत आहे. 


सरफराज खानच्या वडिलांचा व्हिडीओ



बाप लेकाचं नातं 


बाप लेकासाठी असा भावूक होण्याचा हा क्षण फार दुर्मिळ आहे. अनेकदा बाप-लेकीचं नातं अधोरेखित केलं जातं. पण वडिल-मुलाचं असं नातं कमी पाहायला मिळत नाही. त्यामुळे सरफराज खान आणि नौशाद खान यांचं हे घट्ट नातं पाहून सगळ्यांनाच आनंद झाला. मुलाच्या प्रत्येक यशामध्ये बाप कायम स्वतःचं यश बघत असतो. पण अनेकदा हे नातं दुर्लक्षित असतं. वडिल कधीच व्यक्त होत नाहीत. पण त्यांची काळजी, चिंता आणि आनंद अनेक कृतीतून दिसत असतो. असाच आनंद सरफराज खानच्या वडिलांच्या कृतीतून दिसत आहे.  


बाप व्यक्त होत नाही 


वडिलांसाठी मुलांच यश त्यांच सुख अत्यंत महत्त्वाचं असतं. पण वडिल कधीच व्यक्त होत नसतो. त्यांना मुलांच्या यशाबद्दल काय वाटतं याबाबतही ते मनमोकळेपणाने बोलत नाही. पण बापाला कायमच मुलांच्या यशाचं कौतुक असतं. आपल्या मुलाला जगातील सगळं सुख मिळावं असं वाटत असतं. पण तरीही बाप व्यक्त होत नाही. बापाच्या मनातील गोष्टी समजणं खूप कठीण असतं.