Wedding Shubh Muhurat 2023 : कार्तिकी एकादशीनंतर दुसऱ्या दिवशी तुळशीचं लग्न (Tulsi Vivah 2023) पार पडतं. देवउठनी एकादशीला विष्णू देव चार महिन्याच्या निद्रावस्थेतून जागं होतो अशी मान्यता आहे. तुळशी विवाहपासून लग्नाच्या मुहूर्ताला सुरुवात होते. सनातन धर्मात यशस्वी वैवाहिक जीवनासाठी विवाहाच्या शुभ दिवस आणि शुभ मुहूर्तावर विशेष लक्ष दिलं जातं. जर तुमच्याही घरात लगीनघाई असेल तर 2023 च्या शेवटच्या महिन्यात लग्नासाठी काही मोजकेच शुभ मुहूर्त (Wedding Shubh Muhurat) आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुभ दिवसांमध्ये विवाह केल्यानं वैवाहिक जीवन सुखी होतं, अशी मान्यता आहे. लग्नाचा दिवस शुभ काळ, जन्माच्या वेळी नक्षत्र आणि चंद्राची स्थिती यासह अनेक गोष्टी लक्षात घेऊन ठरवलं जातं.  त्यामुळे आता यंदाच्या वर्षात कोणकोणते शुभ मुहूर्त आहेत पाहुया...


जाणून घ्या तारखा


जर तुम्ही देखील यंदाच्या वर्षातच लग्नाचा विचार करत असाल तर तुम्ही 23 नोव्हेंबर, 24 नोव्हेंबर, 24 नोव्हेंबर, 25 नोव्हेंबर, 27 नोव्हेंबर, 28 नोव्हेंबर आणि 29 नोव्हेंबरला लग्नाचा दिवस निश्चित करू शकता. तसेच डिसेंबर या शेवटच्या महिन्यात 4 डिसेंबर, 5 डिसेंबर, 6 डिसेंबर, 7 डिसेंबर, 8 डिसेंबर, 9 डिसेंबर आणि 15 डिसेंबर हे लग्नासाठी शुभ मुहूर्त ठरत आहेत.


होऊ द्या खर्च


कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचा मते 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत 4.25 ट्रिलियन रुपये अर्थात 51 अब्ज डॉलरची विक्री केली जाईल. म्हणजेच या काळात लग्नाच्या खरेदीवर 21.37  लाख रुपये खर्च केले जातील, असा अंदाज वर्तविण्यात आली आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक असलेला देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आता लग्नसराईसाठी मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जाईल, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)