Side effects of watching TV while eating : जेवणाचा कंटाळा आला आहे, मग तुमचा आवडता कार्यक्रम पाहताना विनाकारण जेवता तेव्हा ते वजन वाढीसाठी कारणीभूत ठरतात. गरज नसताना, पोट भरलेले असतानाही अतिरिक्त अन्न खाणे याला ओव्हर इटिंग म्हणतात. 'कधीकधी विनाकारण जास्त रिकाम्या पोटी राहिल्याने तुम्हाला गॅस, पोट खराब, मळमळ, आळस, जळजळ, कंटाळा इत्यादी गोष्टींचा त्रास होऊ शकतो. याव्यतिरिक्त, ही सवय तुमच्या भूक लागण्याच्या प्रक्रियेत बदलू करुन, वजन वाढविण्यासाठी कारण ठरु शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एन्व्हायर्नमेंटल जर्नल ऑफ हेल्थ या प्रतिष्ठित मॅगजीनमध्येमध्ये मुलांच्या खाण्याच्या सवयींबाबत संशोधन करण्यात आले. असे म्हटले जाते की, "टीव्ही पाहत जेवण करणाऱ्या 10 वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका अनेक पट्टींनी वाढत आहे. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाच्या वेळी कौटुंबिक संवादामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होतो. 


जेवताना टीव्ही बघण्याचे दुष्परिणाम


टीव्ही पाहताना जेवणे


जेवणाचे ताट समोर ठेवून आपण टीव्हीवर आपल्या आवडीचे कार्यक्रम शोधत असतो. अशावेळी अर्धे लक्ष समोर काय घडत आहे हे बघण्यात असते. अशावेळी आपण किती जेवलो आहोत हे पटकन समजत नाही, त्यामुळे अनेकदा आपण गरजेपेक्षा जास्त जेवण किंवा फुटकळ पदार्थांचे सेवन करतो. 


तणावाखाली जेवण करणे


जेव्हा तुम्हाला एखाद्या विचित्र गोष्टीमुळे किंवा परिस्थितीमुळे तणाव जाणवतो किंवा अशा वेळी तुमच्या शरीरातील काही हार्मोन्सची पातळी वाढल्यामुळे तुम्हाला गोड, मसालेदार किंवा जास्त चरबीयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा होते. याचा अर्थ असा की, सर्वप्रथम, तुमच्यावर कोणत्या गोष्टीचा ताण येत आहे त्यावर काही उद्दिष्टे देऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. 


कंटाळा आल्यावर काहीतरी खाणे


कंटाळा आलाय, काहीतरी खावंसं वाटतंय, हे वाक्य दिवसातून चार-पाच वेळा म्हंटलं जातं आणि शेवटी तुम्ही चॉकलेट्स, तेलकट वेफर्स, मिठाई, प्रक्रिया केलेले पदार्थ खातात. यामुळे तुम्हाला तात्पुरता आनंद मिळतो आणि तुमचा मूड सुधारतो. पण, जर तुम्ही असे वारंवार करत असाल तर तुमचे वजन वाढते हे तुम्हाला समजत नाही.


घरापेक्षा बाहेरच अधिक फुटकळ खाणे 


जेव्हाही तुम्ही बाहेरचे जेवता तेव्हा कोणत्याही कारणाशिवाय दोन्ही गोष्टी जास्त मागवल्या जातात. जर तुमचे पोट गच्च भरलेले असले तरी शेवटी आइस्क्रीम किंवा गोडाच्या पदार्थसाठी हमखास जागा केली जाते. सार्वजनिक आरोग्य पोषणाच्या प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार व्यक्ती घरी बनवलेल्या अन्नपदार्थांपेक्षा हॉटेल्समध्ये अधिक प्रमाणात पदार्थांचे सेवन करतात. नेहमीपेक्षा 200 कॅलरीज जास्त खाल्ल्या जातात. 


भरपूर अन्न खा


एखाद्याचे दोन घास खाऊन होईपर्यंत समोरच्या व्यक्तीचे संपूर्ण जेवण झालेले असते. तुम्हीही असे करीत असाल तर ही टीप तुमच्यासाठी. अनेकदा सवय असली तरीही भराभर जेवणाच्या नादात काही अन्नपदार्थ व्यवस्थित चावले जात नाहीत. किंवा तुम्हाला कुठेतरी जायचे आहे आणि त्या नादात एकापाठोपाठ असे एक असे  घास खाल्ले जातात. असे करीत असताना नकळत तुमच्याकडून प्रमाणापेक्षा जास्त आहार घेतला जाण्याची शक्यता असते.