लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत तसंच खवय्येंचा कायमच आवडता पदार्थ म्हणजे बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी बनवायला सहज सोपी असल्याने आठवड्यातून दोन ते तीन वेळा प्रत्येकाच्या घरी बनवली जाते. त्यामुळे  बऱ्याचदा गृहिणी जास्तीचे बटाटे घरी स्टोर करून ठेवतात. असं असलं तरी बटाटे फार काळ टिकत नाही. बऱ्याचदा मॉलमधून किंवा ऑनलाईन ऑर्डर केलेले बटाटे पॅकेटबंद असतात. त्यामुळे ते लवकर खराब होतात. बटाटे जास्त काळ फ्रेश राहावे यासाठी काही खास टिप्स जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


बटाटा लवकर खराब होतो . तज्ञांच्या म्हणण्यानुसार बटाटा योग्य रीतीने स्टोर केल्यास तो महिनाभर चांगला टिकतो. बऱ्याचदा आपण मार्केटमधून आणलेले बटाटे हे प्लॅस्टिकच्या पिशवीत स्टोर केले जातात. त्यामुळे ते लवकर खराब होतात. असं न करता बटाटे कागदात गुंडाळून ठेवणं फायदेशीर ठरतं. बटाटे कागदी पिशवी गुंडाळून ठेवल्याने ते जास्त काळ टिकतात. 


बटाटे जास्त दिवस साठवून ठेवले तर त्याला कोंब फुटतात, त्यामुळे ते  जेवणात वापरता येत नाही. म्हणूनच बटाटे खराब होऊ नये किंवा त्याला कोंब फुटू नये करीता सोबत एक सफरचंद ठेवला की, बटाटे बरेच दिवस चांगले टिकतात. 


 प्रत्येकाच्या घरात स्वयंपाकामध्ये कांदे आणि बटाटे मोठ्या प्रमाणात वापरले जातात. बऱ्याचदा आपण मार्केटमधून कांदे आणि बटाटे एकाच पिशवीतून आणतो. तसंच घरी आणल्यानंतर ते एकाच टोपलीत स्टोर करून ठेवतो.त्यामुळे भाज्या लवकर  खराब होतात.  भाज्या घरी आणल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या टोपलीत स्टोर करून ठेवावं. असं केल्यास भाज्या लवकर खराब होत नाही. तज्ञांच्या म्हणण्यानुसार कांदा आणि बटाटा एकत्र ठेवल्याने ते लवकर खराब होतात. 


कोंडलेल्या किंवा हवाबंद ठिकाणी ठेवलेले बटाटे लगेच खराब होतात. त्यामुळे बटाटे मोकळ्या हवेत ठेवावेत असं तज्ञांकडून सांगितलं जातं. कोणतेही कंदमुळं ,पालेभाज्या किंवा फळभाज्या या ताज्या असतानाच त्याचं सेवन करावं. बटाटे फार काळ साठवून ठेवल्याने आरोग्यासाठी फायदेशीर असणारे व्हिटामीन आणि मिनरल्स कमी होतात. त्यामुळे कोणत्याही भाज्या सहसा स्टोर न करता ताज्या असतानाच त्यांचं सेवन करावं असं सांगण्यात येतं.