Kitchen Tips in Marathi : शेतकरी सहसा शेतात पिकवलेले धान्य साठा करुन ठेवत असतात. तसेच काहीजण वर्षभरासाठी धान्याचा साठा करुन ठेवतात. जेणेकरुन पावसाळ्याच्यावेळी सहज उपलब्ध होतील. यामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी व इतर डाळी ठेवल्या जातात. परंतु, धान्य साठवल्यानंतर त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण बहुतेकदा धान्यांना बुरशीचे किंवा कीटकांचे नुकसान होते. त्यामुळे धान्य खराब होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशावेळी, एकतर धान्य फेकून देण्याची वेळ येते तर किंवा त्याला निवडत बसण्याची वेळ येते. जोपर्यंत धान्याची योग्य काळजी घेतली जाते तोपर्यंत त्याला किडे किंवा बुरशी लागत नाही. जर तुम्हाला असे वाटत असेल की धान्यांमध्ये कीटक आणि बुरशी लागू नयेत, तेव्हा तुम्ही काही घरगुती उपाय करुन पाहू शकता. या उपयांमुळे धान्यांवर कीटक, कीड किंवा बुरशीचा परिणाम होणार नाही. तसेच धान्य वर्षभर उत्तम टिकून राहतात. 


लवंग


तांदूळ आणि डाळींना कीटकांपासून सुरक्षित ठेवायच असेल तर लवंगचा वापर करु शकता. यासाठी डब्यामध्ये लवंग ठेवा. त्याच्या उग्र वासामुळे कीटक धान्यांपासून दूर राहतील आणि मुंग्याही येणार नाहीत.  तुम्ही लवंगच्या जागी लवंगाच्या तेलाचा देखील वापर करु शकता. 


लसूण


लसनाची वास खूप तीव्र असतो. यामुळे तांदूळ व इतर धान्यांच्या डब्यात लसणाच्या काही पाकळ्या कापडात बांधून ठेवा. या उपायामुळे  किडे धान्यापासून दूर राहतील आणि धान्य सुरक्षित राहतील.


तमालपत्र 


तमालपत्र हे पदार्थाची चव वाढवण्यासाठी असतं. मात्र तमालपत्राच्या मदतीने तुम्ही धान्याची सुरक्षा करु शकता. जर तांदूळ आणि डाळीत कीटक आढळत असतील तर धान्यांच्या डब्यात फ्रेश तमालपत्राची काही पाने ठेवा. यामुळे धान्यात कसल्याही प्रकारचे किडे येणार नाहीत. 


कडूनिंब 


गावकडे कडुनिंबाची पाने बहुतेक घरांमध्ये धान्यांच्या साठ्यात पानं ठेवली जातात. यामुळे किटक आणि अळ्या धान्यांच्या डब्यात येत नाही. यासाठी काही कोरडी कडूनिंबाची पानं एका मलमलच्या कापडात बांधून घ्या आणि हे कापड धान्यांच्या डब्याच एका कोपऱ्यात ठेवा. या उपायामुळे धान्यांच्या डब्यात कीटक येणार नाहीत.