Sudha Murthy Nominated for Rajya Sabha : लोकप्रिय लेखिका, इन्फोसिस फाऊंडेशनच्या प्रमुख आणि समाजसेविका सुधा मूर्ती यांची भारताच्या राष्ट्रपतींनी राज्यसभेतील सदस्य म्हणून नामांकित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः एक्स म्हणजे ट्वीटर अकाऊंटवरुन सुधा मूर्ती यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधानांनी लिहिले की, मला आनंद होत आहे की सुधा मूर्ती यांना भारताच्या राष्ट्रपतींनी राज्यसभेसाठी नामांकित केले आहे. सामाजिक कार्य, परोपकार आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रात सुधाजींचे योगदान अतुलनीय आणि प्रेरणादायी आहे. राज्यसभेतील तिची उपस्थिती ही आपल्या ‘नारी शक्ती’चा एक शक्तिशाली पुरावा आहे, जी आपल्या देशाचे नशीब घडवण्यात महिलांची ताकद आणि क्षमता दर्शवते. मी त्यांना यशस्वी संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो.


नातं महत्त्वाचं 


सुधा मूर्ती म्हणतात की, आयुष्य हे एक पारितोषिका समान आहे. डिग्री, पैसा आणि सुखसोईंबरोबरच मनाची शांती महत्त्वाची आहे. यामुळेच तुमचं जीवन परिपूर्ण होतं. आयुष्यात माणसं अतिशय महत्त्वाची असतात. नात्यामुळे जीवनात गोडवा निर्माण होतो. नातं तुम्हाला जगण्याची हिम्मत देऊन जातं. 


पैसे जोडतो पण तोडतो देखील 


सुधा मूर्ती यांनी पुस्तकात लिहिलं आहे की, पैसा ही अशी गोष्ट आहे. जो कायमच लोकांना कमी पडतो. पैसा माणसांना जोडतो पण आणि तोडतो देखील त्यामुळे त्याचा वापर करताना योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. पैशामुळे अनेकदा नात्यात कटूता निर्माण होत असल्याचा अनुभव तुम्ही अनुभवलाच असेल. त्यामुळे पैसा वापरताना सांभाळून वापरणं गरजेचं आहे. 


सोल्युशन महत्त्वाचं आहे


कोणत्याही समस्येचं एक उत्तर नसतं. कायमच तुमचा दृष्टीकोन देखील तितकाच महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही समस्येकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहता हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. जीवनात कोणतंही संकट आलं तरीही तुमचा त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन अतिशय महत्त्वाचा आहे. कारण अनेक समस्या यामधून सोडवल्या जातात. 


स्वतःला स्वीकारा 


सुधा मूर्ती म्हणतात की, प्रत्येकाने आपल्या गुण, दुर्गुण, चांगल्या सवयी आणि वाईट सवयींसकट स्विकारायला पाहिजे. उदाहरण देताना सुधा मूर्ती सांगतात की, कोकिळ नाचू शकत नाही तर मोर गाऊ शकत नाही. त्यामुळे आपल्यातील दोष देखील तितक्याच आवडीने स्वीकारणे गरजेचे आहे. 


स्वतःवर विश्वास ठेवा 


सुधा मूर्ती म्हणतात की, मी अशी अनेक उदाहरणे देईन. जे लोक फार कमी शिकलेले असतात ते देखील स्वतःवर विश्वास ठेवून मोठ्या पदावर जातात. त्यामुळे जीवनात विश्वास अतिशय महत्त्वाचा आहे. कारण तुमच्यातील विश्वासच तुम्हाला पुढे नेण्यास मदत करणार आहे.