7340000000000 कंपनीच्या मालकिणीने नवऱ्याला दिलं होतं 10000 रुपयांचं लोन, जोडीदारासोबत पैशाचे व्यवहार करताना काय काळजी घ्याल?
अनेक वर्षांपूर्वी पत्नी नवऱ्याला लोन देतो. तिने दिलेल्या पैशातून व्यवसाय बहरतो. आज हे कपल कोट्याक्षीश आहेत. पण जोडीदारासोबत असे व्यवहार करताना कोणती काळजी घेणे आवश्यक असते, याबाबत समजून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
1981 मध्ये, भारतीय आयटी क्षेत्रात एक क्रांती सुरू झाली, ज्याचे नेतृत्व फक्त पुरुषांनीच नाही, तर एका महिलेने देखील केली. या महिलेने तिच्या पतीच्या स्वप्नावर विश्वास ठेवला. भारतातील पहिली महिला यांत्रिक अभियंता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुधा मूर्ती यांनी आणखी एक धाडसी पाऊल उचलले. इन्फोसिस चालू ठेवण्यासाठी त्या स्त्रीने अक्षरशः आपल्या ठेवणीतील 10,000 रुपये पतीला सुपूर्त केले. त्या पैशातून पतीने सुरु केलेल्या व्यवसाय आज 7.34 लाख कोटी रुपयांच्या यशापर्यंत पोहोचला आहे. ही गोष्ट साध्या कपलची नसून संपूर्ण जगाला प्रेरणा देणाऱ्या सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती या जोडीची आहे.
सुधा मूर्ती कायमच अनेक कपल्सला मार्गदर्शन करतात. हे मार्गदर्शन प्रत्येक जोडीदारासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. एक संसार म्हणून दोघांनी आपापल्या पद्धतीने संसारात पैशाची गुंतवणूक करणे गरजेचे आहे. अशावेळी कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
ही सामान्य बाब
सुरुवातीला ही गोष्ट थोडी विचित्र वाटू शकतात. संसार दोघांचा असतो. पण मग पैशाच्या व्यवहार हे वेगळे कसे असू शकतात. तर हल्ली दोघंही कामाला जातात. अशावेळी संसारातील अनेक जबाबदार दोघं उचलत असतात. अशावेळी कामासोबतच पैशाची देखील विभागणी होते. आणि ही अतिशय सामान्य बाब आहे. त्यामुळे याबाबत अजिबात चुकीचा विचार करणे त्या दाम्पत्यासाठी घातक ठरु शकते.
पारदर्शकता हवी
नवरा-बायकोने एकमेकांसोबत पैशाचे व्यवहार करताना कायमच पारदर्शकता हवी. कारण या व्यवहारांमुळे अनेकदा संसाराला तडा जाऊ शकते. त्यामुळे व्यवहार करताना विचारांची पारदर्शकता असणे तितकीच महत्त्वाची आहे. अनेकदा कपल मिळून एखादा व्यवसाय सुरु करतात. किंवा एक व्यक्ती बिझनेस करतो आणि दुसरी व्यक्ती नोकरी करत असते. अशावेळी व्यवहारांमध्ये पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची असते.
सन्मान महत्त्वाचा
अनेकदा जोडीदारांमध्ये पैशाचे व्यवहार होतात. यामध्ये एक व्यक्ती थोडी उजवी ठरु शकते. अशावेळी त्या दोघांनीही एकमेकांचा सन्मान राखणे अत्यंत गरजेचे आहे. हा सन्मान स्त्री-पुरुष असा नसून एक व्यक्ती असा असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे कितीही पैशाचा व्यवहार केला. या व्यवहारात मतभेद असले तरीही जोडीदार म्हणून एकमेकांचा आदर करणे तितकेच महत्त्वाचे आहे.