Health Study : लग्नाबद्दल आज तरुण पिढीच्या वेगवेगळ्या कल्पना असतात. आपण हिंदीतील ही म्हण कायम ऐकता आलो आहोत, शादी का लड्डू जो खाए पछतावे और न खावे तो भी पछतावे...आज तरुण तरुणी करिअरबद्दल महत्त्वकांक्षी असून लग्नाला प्राधान्य देत नाही. अनेक तरुण जबाबदारी नको, बायकोची कटकट नको म्हणून लग्नाला नकार देतात. अगदी आजीवन लग्न न करण्याचा निर्णय घेतात. पण थांबा, एका संशोधनातून असं सिद्ध झालंय की, तरुणांना दीर्घ आयुष्य जगायचं असेल तर लग्न आणि पत्नी असायला हवी. काय हे संशोधन आणि यात काय सांगण्यात आलंय पाहूयात. 


बायकोचं महत्व संशोधनातही स्पष्ट!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर, या संशोधनातून असं समोर आलंय की, अविवाहित पुरुष लवकर वृद्ध होतात तर विवाहित पुरुषांची वृद्धत्वाची प्रक्रिया अविवाहित पुरुषांपेक्षा कमी असते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, विवाहित पुरुष दीर्घयुष्य जगतात. मात्र, या संशोधनात हे केवळ पुरुषांच्या बाबतीतच समोर आलंय, तर महिलांमध्ये असा कोणताही बदल दिसून येत नाही. 


अभ्यास काय सांगतो? 


न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार, नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असं दिसून आहे की, विवाहित पुरुषांचे आयुष्य एकटं राहणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत कमी असतं. हा अभ्यास इंटरनॅशनल सोशल वर्क जर्नलमध्ये प्रकाशित झालाय. या अभ्यासात, शास्त्रज्ञांनी 45 ते 85 वयोगटातील प्रौढांच्या आरोग्याचा आणि जीवनशैलीवर तब्बल 20 वर्षे अभ्यास केला. या अभ्यासातून लग्नाचा आरोग्यावर काय परिणाम होतो हे जाणून घ्याचा प्रयत्न करण्यात आला. या संशोधनात शारीरिक, मानसिक आरोग्य तसंच सामाजिक जीवन या बाबींचे मूल्यमापन करण्यात आलं. 


महिलांबद्दल काय आला निर्णय?


संशोधनात असंही समोर आलंय की, विवाहित पुरुषांचं आयुष्य हे अविवाहित मित्रांपेक्षा जास्त असतं. पण यासाठी त्याला आयुष्यभर विवाहित राहणे महत्त्वाचे आहे, तरच हे शक्य आहे. संशोधनात असेही समोर आलंय की, जर लग्न मोडलं, घटस्फोट झाला किंवा जोडीदाराचा मृत्यू झाला तर त्याचा वृद्धत्वाच्या प्रक्रियेवर याचा नकारात्मक परिणाम होतो. मात्र लग्न झालेली महिला आणि अविवाहित महिला यांच्या लग्नाच्या वयात फारसा फरक दिसून येतं नाही. अविवाहित महिलांपेक्षा विवाहित किंवा घटस्फोट घेणाऱ्या महिलांना अधिक त्रास असतो, असं संशोधनातून समोर आलंय. 


एकट्या राहणाऱ्या महिलाबद्दलही काय सांगतं संशोधन?


शास्त्रज्ञांच्या आई यांनी याबद्दल भाष्य करत म्हटलंय की महिलांसाठी हे सिद्ध पूर्णपणे उलट आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की महिलांना एकटे राहणे अधिक आनंदी वाटतं. तर पुरुषांसाठी एकटे राहणे कठीण असतं. आणखी एका संशोधनात असंही आढळून आलंय की महिलांना एकट्याने अधिक आनंदी मिळतो आणि त्यांना रोमँटिक संबंधांची गरजही कमी असते. 


तज्ज्ञांच्या मते, महिलांना त्यांचे कुटुंब आणि मित्रांकडून अधिक सहकार्य मिळतं. तर लग्नानंतर ते घरातील कामात अडकतात आणि काही वेळा त्यांना त्यांच्या लैंगिक समाधानाकडेही दुर्लक्ष करावं लागतं, जे त्यांच्या समस्यांचे कारण बनतं.


याशिवाय इतरही अनेक संशोधनातून असंही दिसून आलंय की विवाहित पुरुष एकटे राहणाऱ्या पुरुषांपेक्षा अधिक आनंदी असतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रकाशित अहवालात असं म्हटलंय की विवाहामुळे महिलांच्या मृत्यूचे प्रमाण एक तृतीयांश कमी होते. याशिवाय, नेचर ह्युमन बिहेवियर जनरलच्या अहवालात असं सांगण्यात आलंय की, विवाहित लोकांच्या तुलनेत अविवाहित लोक मानसिक समस्यांशी जास्त संघर्ष करतात. संशोधनानुसार विवाहित लोकांपेक्षा अविवाहित लोकांना नैराश्याने ग्रासण्याची शक्यता 79% जास्त असते. हा धोका विधवा महिलांमध्ये 64 टक्के आणि घटस्फोटित महिलांमध्ये 99 टक्के वाढतो.