Parenting Tips in Marathi: सद्गुरुंना आपण सगळेच एक आध्यात्मिक गुरु या रुपात ओळखतो. जीवन जगत असताना ते अतिशय योग्य सरळ मार्ग आपल्याला सुचवत असतात. मार्गदर्शन करत असतात. अशावेळी सद्गुरु पालकांना योग्य मार्गदर्शन करतात. तसेच पालकांना तुम्ही काय संस्कार देता हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे. अनेक पालक सद्गुरुंना मानतात. सद्गुरुंनी सांगितलेल्या विचारांना महत्त्व देतात. संगोपन करत असताना कोणत्या चुकीच्या गोष्टी सद्गुरुंना खटकतात, ते जाणून घेऊया. 


खरं प्रेम करा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालकांना सद्गुरु खूप चांगला सल्ला देतातत. आपल्या मुलांशी कायमच प्रेमाने वागायला हवं. एवढंच नव्हे तर मुलांवर खरं प्रेम करायला हवं, असं सद्गुरु म्हणतात. मुलांवर प्रेम करणे म्हणजे त्यांच्या सगळ्या मागण्या पुरवणे असे नाही तर त्याला नेमकं कशाची गरज आहे, हे समजून घ्या? मुलांना भेट वस्तूची नाही तर तुमच्या प्रेमाची गरज आहे. ही गरज समजून पालकांनी मुलांशी वागायला हवं 


सपोर्ट करा 


सद्गुरुंच्या म्हणण्यानुसार आपल्या मुलाला सगळ्या गोष्टीत सपोर्ट करा. मुलाला जीवनात काही ध्येय गाठायचं असेल तर त्याला तुमच्या पाठिंबाची गरज आहे. मुलांना कायम सपोर्ट करा. द्गुरूंच्या मते पालकांनी आपल्या पाल्याला सर्व प्रकारे साथ दिली पाहिजे. आपल्या मुलाला त्याच्या आयुष्यात जी ध्येये साध्य करायची आहेत त्यासाठी त्याला पाठिंबा द्या. जर तो चुकीच्या मार्गाकडे वळत असेल तर त्याला तुमच्या अनुभवाने मार्गदर्शन करा. जर तुमच्यात आणि तुमच्या मुलामध्ये प्रेम आणि परस्पर समंजसपणा असेल तर तुम्ही जे काही करत आहात ते त्याच्या भल्यासाठी आहे हे त्याला समजेल.


घरातील वातावरण सुधारा 


जर तुम्हाला तुमचा मुलगा आनंदी आणि मानसिकरित्या ताकदवान  बनवायचा असेल तर तुम्हाला त्याचा पाया तुमच्या घरातूनच ठेवावा लागेल. तुमच्या घरातील वातावरण आनंदी आणि प्रेमाने भरलेले ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही तुमच्या मुलासमोर भीती आणि चिंता दाखवली तर तो आनंदी राहायला कसे शिकेल? तो तुमच्याकडून भीती आणि काळजी देखील शिकेल. हे टाळण्यासाठी तुमच्या मुलाला घरात आनंदी आणि प्रेमळ वातावरण द्या.


स्वतःला ऍक्ट्रक्टिव बनवा 


मुलासमोर तुम्हाला स्वतःला आकर्षक दाखवावे लागेल. मुलांवर टीव्ही, शेजारी, शिक्षक, शाळा आणि इतर अनेक गोष्टींचा प्रभाव पडतो. त्यांना जे सर्वात आकर्षक वाटतं, ते ते फॉलो करू लागतात. मुलांसमोर तुम्हाला स्वतःला आकर्षक बनवावे लागेल जेणेकरून ते तुमचे अनुसरण करतात.