Unlucky Baby Names For Boys and Girls: पालक मुलांसाठी नाव निवडताना वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करतात. जसे की, जुनी नावे, गुगलवरुन मुलांची नावे किंवा कोणती यादी पाहतात. पण असं करताना पालकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. कारण तुम्ही मुलांना देत असलेली नावे आणि त्याचा अर्थ तपासणे गरजेचे असते. कारण काहीवेळी नावे अतिशय युनिक आणि वेगळी असतात. पण या नावांचा अर्थ किंवा या नावांशी संबंधित आठवणी या अगदी नकारात्मक असतात. किंवा त्या नावांचा आणि जगाचा एक नकारात्मक आठवणींचा कोपरा असतो. अशावेळी ही नावे अजिबात निवडू नका. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुर्गेश 


दुर्गेश या नावाचा अर्थ आहे किल्ल्यांचा राजा. पण तुम्ही हे नाव नीट पाहिल्यावर लक्षात येईल यामध्ये अत्यंत मेहनत आणि अडथळ्यांचा मार्ग असा अर्थ दडलेला आहे. हा नकारात्मक अर्थ या नावावर संस्कार करतो. त्यामुळे मुलांसाठी कधी दुर्गेश हे नाव निवडू नका. 


निर्भय 
निर्भय या नावाचा अर्थ आहे भयमुक्त. असं असलं तरीही या नावामध्ये भय हा नकारात्मक अर्थ आहे. जेव्हाही तुम्ही असं नाव उच्चारता तेव्हा तो अर्थ निघतोच. त्यामुळे पालकांना हे नाव कितीही आवडत असले तरीही याची निवड कधीच करु नका. 


राहुकाल 
वेदातील हे राहुकाल असं नाव आहे. राहु आणि काल अशा दोन नावांचा उल्लेख या राहुकाल हे नाव आहे. अशावेळी नकारात्मक विचार आणि वाईब्स असणाऱ्या या नावांचा कधीच उल्लेख करु नका. 


नकुल
महाभारतातील पांडवांपैकी एका भावाचे नाव नकुल असे आहे. पण या नावाचा विचार कधीच तुमच्या मुलासाठी करु नका. कारण पांडंवांच आयुष्य किती खडतर होतं हे आपण जाणतोच त्यामुळे अशा खडतर आयुष्य असलेल्या नावाचा विचार मुलासाठी करु नका. 


मंदोदरी 
रावणाच्या पत्नीचे नाव होते मंदोदरी. रावण हा नकारात्मक विचार आणि तसेच रावणाची पत्नीचे असलेले हे नाव नकारात्मकतेने भरलेले आहे. त्यामुळे हे नाव मुलीसाठी कधीच निवडू नका. 


असुरा 
हिंदू पौराणिक कथेनुसार असुरा हे नाव देवाच्या विरुद्ध असे आहे. नकारात्मक कनेक्शन असलेल्या या नावाचा विचार मुलीसाठी कधीच करु नका. 


माक्षार्थ 
गुगलवर या नावाचा अर्थ आहे मातेच्या हृदयातील बाळ. पण संस्कृतमध्ये माशी असा याचा अर्थ होतो. 


अनुवा 
अनुवा या नावाचा अर्थ गुगलवर आहे ज्ञानवान. पण अशा नावाचा कोणतंच नाव नाही. त्यामुळे हे नाव मुलीसाठी किंवा मुलासाठी निवडू नका.